मुंबई, 09 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. लग्न, मुलीचा जन्म यानंतरही तिने स्वत:ला एकदम फिट ठेवलं आहे. पण तिला सुद्धा कधी कधी बाहेरचे चमचमीत, तेलकट पदार्थ खायचा मोह होतो. वडापाववर ताव मारतानाचा शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ(Viral Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
..आणि शिल्पाने मारला 'वडापाव'वर ताव
शिल्पाने स्वत: आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिल्पा कर्जतवरुन मुंबईला येत असताना तिला रस्त्यात वडापाव दिसला. आणि तिने त्या वडापाववर चांगलाच ताव मारला. वडापावसोबत समोसे आणि भजीही तिने चाखली. हा व्हिडीओ पाहून शिल्पाचे फॅन्स तिला तिच्या डाएटची आठवण करुन देत आहेत.
वडापाव खातानाचा हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन दिलं आहे. "चलते, चलते देखा वडा पाव मनने बोला संडे है.. तो खाओ खाओ बनता है भाऊ.' शिल्पा एका कामानिमित्त कर्जतला गेली होती. तेव्हा तिने या वडापावचा आस्वाद घेतला. तिकडचा क्रिस्पी आणि झणझणीत वडापाव तिला फार आवडतो. असंही तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.