अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आईसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने आणि तिच्या आईने सारखाच ड्रेस घातला आहेत. या दोघी अतिशय सुंदर दिसत आहेत.
मुंबई, 24 डिसेंबर: शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) घरी सगळे सण उत्साहात साजरे केले जातात. मग ती दिवाळी असो वा नाताळ. आताही शिल्पा शेट्टी नाताळच्या तयारीला लागली आहे. नाताळच्या आधी शिल्पाने तिच्या आईसोबत ट्विनिंग केलं. हा फोटो शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दोघी अतिशय सुंदर दिसत आहेत. शिल्पाच्या या फोटोला आत्तापर्यंत 94 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत.
या फोटोला शिल्पाने कॅप्शन दिलं आहे, ‘ख्रिसमसिंग, ट्विनिंग, ड्रिमिंग अँड विनिंग’ असे हॅशटॅग शिल्पाने वापरले आहेत. तसंच ‘हा फोटो माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहील कारण हे आमचं एकत्र पहिलं फोटोशूट आहे’ शिल्पाचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टीने नुकतंच एका पंचतारांकित हॉटेल सुरू केलं आहे. तिच्या हॉटेलच्या उद्घाटनाला रितेश देशमुखही गेला होता. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे फोटो आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल ती चाहत्यांना माहिती देत असते. शिल्पा मोठ्या पडद्यापासून अनेक वर्ष लांब असली तरी आजही तिचे अनेक चाहते आहेत. शिल्पाचे फिटनेस व्हिडीओही व्हायरल होत असतात.