पावसात फिरायला निघाली शिल्पा शेट्टी, पण ड्रेसनं 'असा' दिला दगा

पावसात फिरायला निघाली शिल्पा शेट्टी, पण ड्रेसनं 'असा' दिला दगा

बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेत्री प्रत्येक वेळी स्टायलिश दिसणं पसंत करतात. मात्र ही स्टाइल त्यांना अनेकदा महागात पडलेली दिसून येते.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेत्री प्रत्येक वेळी स्टायलिश दिसणं पसंत करतात. मात्र अनेकदा त्यांना हे स्टालिश ड्रेस असे महागात पडतात की, त्यांना त्यामुळे ट्रोल व्हावं लागतं. नुकताच काहीसा असाच नजारा पहायला मिळाला जेव्हा बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री तिची सैल जीन्स सांभाळताना दिसली. यानंतर या अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं. सोशल मीडियावर तिला अनेकजण वेगवेगळे सल्ले देताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही तर बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

शिल्पा नुकतीच पावसात फिरायला जाताना दिसली. यावेळी तिनं पिंक टी-शर्ट आणि व्हाइट जीन्स घातली होती. या आउटफिटमध्ये ती खूपच कूल दिसत होती. जशी शिल्पाला फोटोग्राफर्स पाहिल्यावर सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले. शिल्पाचे हे हॉट फोटो फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये शिल्पा सतत जीन्स ठिक करताना दिसत आहे. मग काय नेटकऱ्यांनी नेमकी हिच गोष्ट ताडली आणि शिल्पाला ट्रोल करायला सुरूवात केली.

VIDEO : रवीनासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करत होता गोविंदा आणि...

 

View this post on Instagram

 

That's called eye yoga @theshilpashetty just invented it 😎 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

एका युजरनं लिहिलं, हिची पॅन्ट खाली घसरत आहे का? तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, कोणतरी हिला बेल्ट आणून द्या नाहीतर तिची पॅन्ट खाली पडेल. तशी तु हॉट दिसत आहेस शिल्पा. आपल्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक असलेली शिल्पा नेहमीच तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. मागच्या बऱ्याच काळापासून ती सिनेमांपासून दूर आहे. पण लवकरच ती मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

===================================================================

पहिल्यांदा उघडले सरदार सरोवर धरणाचे दरवाजे, पाहा VIDEO

First Published: Aug 10, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading