मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा ट्रोल! श्वानांसह Photo काढताना दिल्या अजब पोज

शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा ट्रोल! श्वानांसह Photo काढताना दिल्या अजब पोज

 बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावते. ती पापाराझी आणि मीडियाशीला ज्या प्रकारे प्रतिसाद देते ते तिच्या चाहत्यांना फार आवडत. परंतु काही लोकांना तो शिल्पाचा अभिनय वाटतो. अलीकडेच शिल्पा रस्त्यावरील डॉगीजसोबत फोटो क्लिक करताना दिसली. त्यांनतर ती ट्रोल (Trolle) होऊ लागली आहे. लोक हे फोटो पाहून अभिनेत्रीला पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टी नावाने ट्रोल करू लागले आहेत.

शिल्पा शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विरल भयानीने हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये शिल्पा फिल्मसिटीमध्ये रस्त्यावरील श्वानसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. ही छायाचित्रे पाहून काही लोकतिच्यावर प्राणीप्रेमी म्हणत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काही जण शिल्पाला तिची पोज पाहून राज कुंद्राचे नाव घेऊन ट्रोल करत आहेत.व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, काही रस्त्यावरचे श्वान शिल्पाजवळ बसलेले दिसत होते. ते पाहून शिल्पाने मजेशीर पोझ देण्यास सुरुवात केली आहे. शिल्पा शेट्टीचे हे फनी एक्सप्रेशन कॅमेऱ्यात कैद झाल्यावर काही लोकांनी त्यावर अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

(हे वाचा:VIDEO: Aryan Khan ला जामीन मिळताच अबरामने हात उंचावत चाहत्यांना दिला प्रतिसाद)

युजर्सनी केल्या अशा कमेंट्स-

एका यूजरने लिहिले - 'राज कुंद्रालाही शिकवा'. दुसर्‍याने लिहिले- 'पतीनेही काही प्रशिक्षण घेतले असते तर...'. दुसर्‍याने लिहिले - यापैकी राज कुंद्रा कोण आहे. एका यूजरने लिहिले - रेड कार्पेट चांगला आहे, पण तिच्या पतीच्या ब्लू फिल्म व्यवसायाचं काय? त्याचवेळी काही यूजर्स तिच्या बहिणीबद्दल टोमणे मारत होते. एका यूजरने लिहिले की, ती आपल्या बहिणीला काही समजावून का सांगत नाही'.

(हे वाचा:Aryan Khanला जामीन मिळाल्यानंतर बहीण Suhana ने म्हटले हे तीन शब्द; खास फोटोही ..)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. शिल्पाच्या पतीला जुलैमध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक व्यक्तींनी समोर येत धक्कादायक खुलासे केल्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर बनलं आहे. तसेच पोलिसांनीही आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यांनतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलदेखील झाली होती. तिने 'सुपर डान्सर ४' या शोमधून काही काळासाठी ब्रेकदेखील घेतला होता. सध्या राज कुंद्रा जामीनावर बाहेर आहे.

First published:

Tags: Entertainment, Shilpa shetty