मुंबई, 28 सप्टेंबर: बॉलीवूड मधील शिल्पा (Shilpa Shetty latest news) आपल्या फीट स्लिम बॉडीसाठी ओळखली जाते. यामगाचे कारण ती नियमित योगाभ्यास (Shilpa Shetty Yoga video marathi news) करते. पण आता शिल्पासोबत तिची मुलं देखील योगाभ्यास करताना दिसत आहे. नुकताच शिल्पानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंट (Shilpa Shetty instagram video) तिच्या मुलांचा व्हिडियो शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलीवूड मधील शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेससाठी वर्कआउट आणि योगाभ्यास करते. यासोबत सोशल मीडियावर ती जास्त सक्रिय असताना दिसते. ती सतत आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर आपले योगा करतानाचे व्हिडियो शेअर करत असते. हल्लीच तिनं आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर आपल्या मुलांचा योगा करतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. त्यात ती दोघंही क्यूट दिसत आहेत. तिनं शेअर केलेला हा व्हिडिओ इतका व्हायरल होतोय की, सर्वांनी त्या दोघांचे या व्हिडिओ वर लाईक्स आणि कमेंट चा वर्षाव करत त्यांचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
शिल्पा नं शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल...
शिल्पा ने काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिच्या दोन्ही मुलांचा योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा व्हिडिओ शेअर करताच या व्हिडिओ ला भरपूर लाइक्स आणि कमेंट आल्या आहेत. शिवाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
'पवित्र रिश्ता 2' BTS VIDEO होतोय व्हायरल; असा होता अर्चना-मानवचा पहिला सीन
या व्हिडिओ मध्ये तिची लहान मुलगी समिशा तिच्या मोठ्या भावाला याला कॉपी करताना दिसत आहे. यामध्ये शिल्पा चा मोठा मुलगा वियान योगा करत असताना, तिची लहान मुलगीसुद्धा वियानासारखा योगा करण्याचा प्रयत्न करत आहे.
शिल्पानं कॅप्शनमध्ये काय लिहिलं?
मुलं ही ओल्या मातीसारखी असतात, आपण त्यांना चांगल्या जीवनशैलीनुसार जगायला शिकवले पाहिजे. योग्य आहारासोबत आणि तंदुरुस्त कसे राहता येईल हे ही शिकवले पाहिजे. आणि वियान ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस त्याच्यासमोर मी योगा करायचे, त्यावरून त्याला ही सवय लागली. पण आता माझी लहान मुलगी वियानला बघून त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतेय. ते बघून मला खूप आनंद होत आहे.
HBD: ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोणसोबत 'तमाशा' करणं रणबीर कपूरसाठी होतं फारच कठीण
View this post on Instagram
यासोबत तिने कॅप्शनमध्ये, 'समिशा मला निवडल्याबद्दल धन्यवाद! मी वचन देतो की आमच्यात नात जारी आई- मुलीचं असल तरी आम्ही नेहमी मनापासून मैत्रिणी राहू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram post, Shilpa shetty, Viral video.