• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांची 1500 पानांची चार्जशीट; शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 जणांची साक्षही सामील

राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांची 1500 पानांची चार्जशीट; शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 जणांची साक्षही सामील

मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai crime Branch) बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. तर या चार्जशीटमध्ये 43 लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई 16 सप्टेंबर : मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai crime Branch) बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. तर या चार्जशीटमध्ये 43 लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि शर्लिन चोप्राचाही (Sherlyn Chopra) समावेश आहे. दरम्यान 1500 पानांची ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात असलेला राज कुंद्रा आणि अन्य काही लोक यांच्याविरोधात ही चार्जशीट बनवण्यात आली आहे. जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावनी होणार आहे. 8 सप्टेंबरला राजच्या वकिलांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागीतली होती. त्यावर आता 16 सप्टेंबरला सुनावनी होणार आहे.

    दरम्यान केस तारीख असताना शिल्पा शेट्टी वैष्णो देवीच्या दर्शनाला गेली आहे. राज जेल मध्ये गेल्यानंतर अनेक दिवस शिल्पा मीडियापासून दूर होती. तर तिच्या कामावरही गैरहजर होती. पण नंतर तिने कामही सुरू केलं. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. मुलांसोबत ती एन्जॉय करताना दिसली.

    दरम्यान काही दिवसांपूर्वी शिल्पाने राजचं घर सोडल्याची बातमी समोर आली होती. तर शिल्पा आता राजपासून वेगळी होऊन मुलांसाठी वेगळा विचार करत असल्याचंही समोर आलं होतं. मात्र शिल्पाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:News Digital
    First published: