मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shilpa Shetty: रोहित शेट्टीच्या अँक्शन सीनमुळे तुटला शिल्पा शेट्टीचा पाय; झाली भयंकर अवस्था

Shilpa Shetty: रोहित शेट्टीच्या अँक्शन सीनमुळे तुटला शिल्पा शेट्टीचा पाय; झाली भयंकर अवस्था

अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर पुन्हा एकदा घरी बसण्याची वेळ आली आहे. शिल्पाचा मोठा अपघात झाला असून तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर पुन्हा एकदा घरी बसण्याची वेळ आली आहे. शिल्पाचा मोठा अपघात झाला असून तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर पुन्हा एकदा घरी बसण्याची वेळ आली आहे. शिल्पाचा मोठा अपघात झाला असून तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.

  मुंबई, 10 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या खास अंदाजासाठी आणि स्टाइलसाठी सतत चर्चेत असते. सोशल मीडियावरही शिल्पा सक्रीय असते. शिल्पा शेट्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी होती. मात्र शुटींगदरम्यान शिल्पाचा मोठा अपघात झाला असून अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शिल्पाला चालणंही मुक्शिल झालं असून  तिच्या डाव्या पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे.  अभिनेत्रीनं स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शिल्पाच्या पायाची झालेली अवस्था पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिल्पा शेट्टीनं पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती व्हिलचेअरवर बसलेली दिसत असून तिच्या डाव्या पायाला पूर्णपणे प्लास्टर करण्यात आलं आहे. मागील वर्षी शिल्पा नवरा राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आली होती. त्या प्रकरणामुळे शिल्पा अनेक महिने घरी होती. नवरा घरी आल्यानंतर शिल्पा पुन्हा कामाला लागली. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा अँक्शन सीन करताचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता त्याच कपड्यात शिल्पा हॉस्पिटलमध्ये पाय तोडून व्हिलचेअरवर बसलेली पाहायला मिळत आहे.
  शिल्पाच्या पायाला इतकी मोठी दुखापत झालेली असतानाही अभिनेत्री मात्र कुल अंदाजात दिसत आहे.  शिल्पानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हसत पोझ देताना दिसतेय. इतकंच नाही शिल्पानं पोस्ट देखील शेअर केलीय त्यात तिनं म्हटलंय, 'ते म्हणाले, रोल कॅमेरा अँक्शन - ब्रेक अ लेग आणि मी हे फारचं मनावर घेतलं.  आता एकाच अँक्शनमध्ये सहा आठवडे राहावं लागणार पण मी पुन्हा आणखी स्ट्राँग आणि चांगलं कमबॅक करेन. तोपर्यंत दुवा ओ में याद रखना. प्रार्थना नेहमीच उपयोगी येते'. हेही वाचा - Raju Srivastav Heart Attack: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; Angiography नंतरही बेशुद्धच शिल्पा सध्या रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या नव्या वेब सीरिजचं शुटींग करत होती.
  शुटींग दरम्यानचे काही एक्शन सीन रोहित शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. एक्शन सीन दरम्यानच शिल्पाचा अपघात झाला.
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  दरम्यान शिल्पाचा नवरा राज कुंद्राला मोठ्या ब्रेकनंतर मुंबईच्या वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. यावेळी राज कुंद्रा स्पायडर मॅनचा मास्क घालून आला होता. ही एका बर्थ डे पार्टीची थीम असल्याचं म्हटलं जात आहे.  राज कुंद्राचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या