दुसऱ्यांदा आई होण्यासाठी का घेतली सरोगसीची मदत, शिल्पा शेट्टीनं केला खुलासा

दुसऱ्यांदा आई होण्यासाठी का घेतली सरोगसीची मदत, शिल्पा शेट्टीनं केला खुलासा

शिल्पानं समीशाच्या जन्मासाठी सरोगसीची मदत का घेतली आणि हे सर्व कसं घडलं याबद्दल याचा खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी शिल्पानं सरोगसीच्या मदतीनं मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीचा फोटो शेअर करत शिल्पानं ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली होती. शिल्पानं तिच्या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. याआधी शिल्पाला विहान हा 7 वर्षांचा मुलगा आहे. समीशाचा जन्म हा शिल्पाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. पण आता शिल्पानं समीशाच्या जन्मासाठी सरोगसीची मदत का घेतली आणि हे सर्व कसं घडलं याबद्दल याचा खुलासा केला आहे.

शिल्पा शेट्टी मुलगी समीशाच्या जन्मानंतर खुप खूश आहे. तिच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पण शिल्पानं ज्याप्रकारे असं अचानक तिच्या मुलीच्या जन्माची माहिती दिली ही गोष्ट तिच्या चाहत्यासाठी धक्कादायक होती. पण आता शिल्पानं मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत या सर्व गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, मला नेहमीच एक मुलगी हवी होती. मी आणि राज मागच्या 5 वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आता आमची इच्छा पूर्ण झाली.

तीन लग्नं, दोन वेळा घटस्फोट, कामापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला अभिनेता

 

View this post on Instagram

 

देवी महालक्ष्मी की कृपा से , आपके घर में हमेशा उमंग और आनंद की रोनाक हो। इस पावन मौक़े पर सभीको दिवाली की हार्दिक शुभकामनाएँ। #diwali #happiness #love #family #gratitude #festival #celebration #phuketdiaries

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पा पुढे म्हणाली, माझं आणि राज कुंद्राचं 2009 मध्ये लग्न झालं. त्यानंतर 2012 मध्ये आमच्या लाइफमध्ये विहान आला. त्याच्या जन्मानंतर आम्ही खुप खूश होतो आणि त्यावेळी आम्ही प्लान केलं होतं की आम्हाला पुढे काय करायचं आहे. सूत्राच्या माहितीनुसार शिल्पा मागच्या 5 वर्षांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत होती. या दरम्यान शिल्पानं दोन सिनेमे साइन केले होते. ‘निकम्मा’ आणि ‘हंगाना’. त्यानंतर तिला हेही समजलं की ती येत्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा आई होणार आहे. त्यामुळे तिनं तिच्या सिनेमांचं शूटिंग लवकर संपवलं.

Indian Idol च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया, कारण वाचून व्हाल हैराण

 

View this post on Instagram

 

||Om Shri Ganeshaya Namah|| Our prayers have been answered with a miracle... With gratitude in our hearts, we are thrilled to announce the arrival of our little Angel, Born: February 15, 2020 Junior SSK in the house ‘Sa’ in Sanskrit is “to have”, and ‘Misha’ in Russian stands for “someone like God”. You personify this name - our Goddess Laxmi, and complete our family. ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀ ~ Please bestow our angel with all your love and blessings❤ ~ Ecstatic parents: Raj and Shilpa Shetty Kundra Overjoyed brother: Viaan-Raj Kundra . . . . . . . . . #SamishaShettyKundra #gratitude #blessed #MahaShivratri #daughter #family #love

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पा शेट्टीनं अद्याप तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. मात्र मुलीचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका लहान मुलीचा हात दिसत आहे. जिने आईचा बोट पकडलं आहे. शिल्पानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला. यातील स चा संस्कृत अर्थ To Have आणि मीशा चा रशियन अर्थ ‘Someone Like God’ असा आहे.

मोठी कमाई! स्मिता पाटील यांच्या बहिणीकडून मिळालेली भेट पाहून अमृता सुभाष भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 01:55 PM IST

ताज्या बातम्या