पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, विहानच्या जन्मानंतर मी बऱ्याच काळापासून बाळाचा विचार करत होते. पण मला ऑटो इम्यून नावाचा एक आजार आहे ज्याला APLA असंही म्हणतात. ज्यामुळे मला पुन्हा आई होणं शक्य झालं नाही. जेव्हाही मी प्रेग्नन्ट राहत असे तेव्हा हा आजार मध्ये येत असे. ज्यामुळे माझा अनेकदा गर्भपात सुद्धा झाला. VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश शिल्पा पुढे म्हणाली, हा एक गंभीर आजार होता. मला विहानला कधीच सिंगल चाइल्ड मोठं करायचं नव्हतं. कारण आम्ही दोन बहीणी होतो. त्यामुळे मला माहित होतं की भावाला बहिणीची किती आवश्यकला असते. त्यासाठी मी इतर वेगळ्या पर्यायाचाही विचार केला. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मी एका बाळाला दत्तक घेण्याचा सुद्धा विचार केला. मला फक्त त्या बाळाला माझं नाव द्यायचं होतं. सर्व काही होणारच होतं अशात ती ख्रिश्चन मिशिनरी बंद झाली. मला चार वर्ष वाट पाहावी लागली. ज्यामुळे फार वैतगले होते. शेवटी मी सरोगसीची मदत घेण्याचं ठरवलं
शिल्पा म्हणाली, जवळपास 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर आम्हाला समीशा मिळाली. एक वेळ तर अशीही आली होती की, जेव्हा अनेक प्रयत्न करूनही मला वाटलं की आता मला दुसऱ्या बाळाचा विचार सोडून द्यायला हवा. या मुलाखतीत शिल्पानं सांगितलं की, विहानच्या जन्मानंतर वाढलेल्या वजनामुळे मला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला होता. प्रेग्नन्सीच्या वेळी माझं 32 किलो वजन वाढलं होतं. पण विहानच्या जन्मानंतर माझं वजन आणखी 2-3 किलो वाढलं. ज्यानंतर लोकांनी माझ्याबद्दल गॉसिप करायला सुरूवात केली होती.
शिल्पा शेट्टीनं बिझनेसमन राज कुंद्रासोबत 2009 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 21 मे 2012 ला तिच्या मुलाचा विहानचा जन्म झाला आणि यंदा 15 फेब्रुवारी 2020 ला मुलगी समीशाचा जन्म झाला. शिल्पा नेहमीच तिच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यावरून लक्षात येतं की शिल्पा सध्या तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. व्हायरल होतोय कपूर सिस्टर्सचा थ्रोबॅक PHOTO, करिना-करिश्माला ओळखणंही झालं कठीण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shilpa shetty