मुंबई, 8 जून : बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज 45 वा वाढदिवस आहे. मागच्या बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर असलेली शिल्पा सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या सोशल मीडियावर तिच्या अलिशान घराची झलक नेहमीच पाहायला मिळते. कधी लिव्हींग रुम, कधी किचन तर कधी जिम. पण आज तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया शिल्पाच्या लग्झरी लाइफ बद्दल... शिल्पा आणि राज कुंद्राच्या या अलिशान बंगल्याच्या आतील नजारा पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.
शिल्पाच्या टॉकटॉक व्हिडीओपासून ते फिटनेस आणि कुकिंग व्हिडीओ पर्यंत सर्वच व्हिडीओंचं शूटिंग तिच्या याच अलिशान बंगल्यात होतं. एवढं सुंदर घर असताना शिल्पाला सेटची गरजच काय असणार. पाहूयात आतून कसा दिसतो हा तिचा अलिशान बंगला...
याशिवाय शिल्पा तिच्या गार्डनमध्ये भाज्यांचं पिक सुद्धा घेते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या मुलासोबत गार्डनमध्ये वांगी तोडताना दिसली होती. तिचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
फिटनेस हा शिल्पाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तिच्या घरात जिम असणं सामान्य गोष्ट आहे. मात्र शिल्पाची जिम खूप खास आहे. फक्त शिल्पाच नाही तर तिचा मुलगा वियान सुद्धा फिटनेस फ्रिक आहे.
शिल्पा फक्त फिटनेसमध्येच नाही तर कुकिंगमध्येही एक्सपर्ट आहे. ती अनेकदा तिच्या युट्यूब चॅनेलवर हेल्दी आणि टेस्टी डिशेसच्या रेसिपी शेअर करत असते. हे सर्व व्हिडीओ तिच्या घरच्या किचनमध्ये शूट होतात.
शिल्पा नेहमीच बाल्कनीमध्ये बसून तिच्या मुलीसोबत टाइम स्पेंड करताना दिसते.
Published by:Megha Jethe
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.