• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shilpa shetty आणि Raj kundra चं नातं तुटणार? अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

Shilpa shetty आणि Raj kundra चं नातं तुटणार? अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) आता एक मोठं पाऊल उचलणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट : पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) पॉर्न केसमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही (Shilpa Shetty) अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तिलाही ट्रोलर्सचा सामना करावा लागतो आहे. त्यात तिच्या एकटीवर कुटुंब आणि मुलांची (Shilpa shetty's kids) जबाबदारी आली आहे, तरी ती स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा (Shilpa shetty instagram) आणि आपलं आयुष्य आधीसारखं जगण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता तिने एक मोठा निर्णय घेतल्याचं समजतं आहे. शिल्पा आपल्या मुलांना घेऊन राज कुंद्रापासून विभक्त होणार असल्याची बातमी मिळते आहे. शिल्पा आपल्या दोन्ही मुलांसह वेगळं राहण्याचा विचार करत आहे. आपल्या मुलांना घेऊन ती राज कुंद्राच्या घरातून बाहेर पडणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार शिल्पाच्या एका मित्राने सांगितलं की, राज कुंद्राचे इतके पैसे अशा मार्गाने यायचे हे शिल्पाही माहिती नव्हतं, तिलाही धक्का बसला होता. आता  आपल्या नवऱ्याने अशा चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशांपासून तिला आपल्या मुलांना दूर ठेवायचं आहे. तिला राजचे पैसे वापरायचे नाहीत. ती रिअॅलिट शो आणि फिल्ममध्ये काम करून त्यातून पैसे कमवून आपल्या मुलांचं पालनपोषण करेल. अद्याप शिल्पाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हे वाचा - BREAKING NEWS : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ED कडून चौकशी सुरू शिल्पा शेट्टी ‘सुपर डांसर 4’ या रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहते आहे. पण, राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर ती या शोमधून देखील गायब होती. नुकताच या शोमध्ये पुनरागमन केलेलं आहे. राजला अटक झाल्यानंतर ती या शोच्या प्रमोशमध्येही सहभागी झाली नाही. आता ती सोशल मीडियावर देखील अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. शिल्पा शेट्टीने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात  तिने ‘टाईम आउट’ बद्दल सांगणारं एका पुस्तकाचा एक भाग शेअर केला आहे. हे वाचा - KBC 13 : अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये भाग घेणं महागात; स्पर्धकाविरोधात आरोपपत्र शिल्पा या पोस्टमध्ये म्हणाली,  ज्यानुसार कोणताही क्षण वाया न  घालवता. आपलं आयुष्य जगावं कारण आयुष्यात पॉज बटण नसतं. बऱ्याचवेळा वेळ चांगली किंवा वाईट असलीतरी आयुष्यातला तणावपूर्ण क्षण आले असती तर, ते आपल्या आयुष्यातून काढू शकतो का? परिस्थिती कशीही असो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण झरझर निघून जात असतो. आपल्याकडे फक्त वेळ असतो आणि प्रत्येक क्षण आपण चांगल्या पद्धतीने जगाला हवा.
  Published by:Priya Lad
  First published: