मुंबई, 24ऑक्टोबर: सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्साह आहे. सर्वच भाविक आप-आपल्या परीने देवीची उपासना करत आहेत. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)ने देखील नवरात्रीनिमित्त 9 कुमारीकांची पूजा केली. तसंच शिल्पाने आपली मुलगी समिशाला सुद्धा सुंदररित्या सजवलं आहे. शिल्पा शेट्टीने तिने केलेल्या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती संपूर्ण पूजा करताना दिसत आहे. छोट्या समिशाच्या पायालाही कुंकू लावून तिची पूजा केली आहे. तसंच इतर आठ कुमारींकांचीही यथायोग्य पूजा केलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाचा नवरा राज कुंद्रा आणि तिची बहीण शमिता शेट्टी दिसत आहेत.
या व्हिडीओला शिल्पाने छानसं कॅप्शनही दिलं आहे. यात शिल्पा म्हणते, "नवरात्रीनिमित्त कुमारींकांचं पूजन करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे. समिशाची ही पहिलीच नवरात्र आहे. त्यामुळे शमिशासाठी आणि आमच्यासाठी ही नवरात्र खूपच खास आहे. मी तिची आणि 8 कुमारीकांची पूजा केली."