मुंबई, 19 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर' पासून (Super Dancer) काही वेळ दूर होती. या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी शोच्या शूटिंगसाठी जात नव्हती. परंतु काही दिवसानंतर आता शिल्पा शेट्टीने पुन्हा सुपर डान्सर शोमध्ये एन्ट्री केली आहे.
सुपर डान्सर 4 च्या अपकमिंग एपिसोडसाठी शिल्पाने शूट केलं आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला असून एका वेगळ्याच अंदाजात ती पाहायला मिळाली. शिल्पा आपल्या अलिशान व्हॅनिटी व्हॅनमधून उतरुन थेट सेटकडे निघाली. तिच्या चेहऱ्यावर निशारा दिसत होती. आधीप्रमाणे शिल्पा उत्साही नव्हती. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी पोज देणाऱ्या शिल्पाने यावेळी मात्र कोणतीही पोज दिली नाही, की फोटोग्राफर्सला नेहमीप्रमाणे रिस्पॉन्सही दिला नाही. ती थेट शूटिंगसाठी सेटकडे निघाली.
मागील महिनाभरापासून सुपर डान्सर्सच्या मंचावर गैरहजर असणारी शिल्पा आता पुन्हा एकदा कामावर परतली आहे. शिल्पा शेट्टी सुपर डान्सर शोसाठी मागील काही वर्षांपासून जज म्हणून काम पाहत असून तिच्या खास अंदाजासाठी ती नेहमीच चर्चेत असते. मात्र पती राजच्या अटकेनंतर ती सुपर डान्सर्सच्या मंचावर गैरहजर होती. शिल्पा शेट्टी कुंद्रा, गीता कपूर (Geeta Kapoor) आणि अनुराग बासु (Anurag Basu) शोमध्ये जज म्हणून काम पाहत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाल्यानंतर शिल्पाचीही चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे शिल्पाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shilpa shetty