मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shilpa shetty : शिल्पा शेट्टीने पुरवले प्रेग्नेंट आलियाचे डोहाळे; मध्यरात्रीच आलियाला दिलं खास सरप्राईज

Shilpa shetty : शिल्पा शेट्टीने पुरवले प्रेग्नेंट आलियाचे डोहाळे; मध्यरात्रीच आलियाला दिलं खास सरप्राईज

shilpa shetty and alia bhatt

shilpa shetty and alia bhatt

प्रेग्नेंट आलिया नेहमी योग्य आहार घेते,योग्य डाएट फॉलो करते. पण आजचा दिवस तिच्यासाठी 'चिट डे' होता. आलिया भट्टला नुकतीच काहीतरी खाण्याची इच्छा झाली. आणि तिची ती इच्छा रणबीरने नाही तर चक्क बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पूर्ण केली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  26 सप्टेंबर:  अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहेत. हे दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत. 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या यशानंतर आता  दोघांच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या बाळाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. काही महिन्यांपूर्वी आलियाने इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली, तेव्हा पासून आलिया तुफान चर्चेत आहे. आलियाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे आलिया चर्चेत आली आहे.

प्रेग्नेंट आलिया नेहमी  योग्य आहार घेते,योग्य डाएट फॉलो करते. पण आजचा दिवस तिच्यासाठी 'चिट डे' होता. आलिया भट्टला नुकतीच पिझ्झा खाण्याची इच्छा झाली. आणि तिची ती इच्छा रणबीरने नाही तर चक्क बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने  पूर्ण केली.

प्रेग्नेंट असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण आलियाची काळजी घेत असेतील, पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील यात मागे नाही. आलियाने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शिल्पाने आलियाला पिझ्झा पाठवला आहे. आलियाने पिझ्झाचा फोटो शेअर करत, शिल्पाचे आभार मानले आहे. इन्स्टा स्टोरीवर फोटो पोस्ट करत ती म्हणाली, 'या स्वादिष्ट पिझ्झासाठी आभार... हा आतापर्यंतचा बेस्ट पिझ्झा आहे... जो मी आता खाल्ला आहे...' आलियाच्या स्टोरीवर शिल्पाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पा म्हणाली, 'तुला पिझ्झा आवडला म्हणून मी प्रचंड आनंदी आहे...' शिवाय शिल्पाने हार्टवाला इमोजी देखील पोस्ट केला आहे.

हेही वाचा - Money Laundering Case: जॅकलिन फर्नाडिसला मोठा दिलासा! 200 करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

याआधी 18 सप्टेंबर रोजी आलियाने पिझ्झा खाण्याची  इच्छा व्यक्त  केली होती. आलियाने 18 सप्टेंबर रोजी मध्यरात्री इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना मुंबईतील बेस्ट पिझ्झाच्या ठिकाणांबद्दल विचारले होते. इंस्टाग्रामवर तिने विचारले होते कि, "मित्रांनो, मुंबईतील पिझ्झा सर्वात चांगला पिझ्झा कुठे मिळतो.'' त्यानंतर शिल्पाने आलियाला पिझ्झा पाठवला असल्याचं कळत आहे.

आता शिल्पा शेट्टीने आलियाचा  हा हट्ट पुरवला त्याची सगळीकडेच चर्चा रंगत आहे. आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे, शिल्पा शेट्टीबद्दल बोलायचं तर, ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Shilpa shetty