मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने महाशिवरात्रीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली आहे. पण याची कोणाला माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरोगसीद्वारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. शिल्पाने हा फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. शिल्पाने समीशाचा फोटो इन्स्टग्रावर शेअर करत तिचं स्वागत केलं आहे. शिल्पाने अचानक आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहत्यांनीही कमेंट्स करत समीशाचं आनंदात स्वागत केलं आहे.
शाहिद कपूरशी ब्रेकअप, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नवरा राज कुंद्रा यांना आधी विहान नावाचा एक मुलगा आहे. तो आता 7 वर्षाचा आहे. 7 वर्षानंतर शिल्पाने आई होण्याचा निर्णय घेतला आणि सरोगसीच्या मदतीने समीशाला जन्म दिला आहे. चाहत्यांसोबतच सर्व स्तरातून शिल्पा आणि राज यांचं अभिनंदन केलं जात आहे.
सुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shilpa shetty