Home /News /entertainment /

Shilpa Shetty आपल्या भविष्याबाबत घेऊ शकते मोठा निणय! पोस्ट शेअर करत दिला इशारा

Shilpa Shetty आपल्या भविष्याबाबत घेऊ शकते मोठा निणय! पोस्ट शेअर करत दिला इशारा

बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पुन्हा एकदा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत (Instagram Post) आली आहे

    मुंबई, 18 सप्टेंबर- बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पुन्हा एकदा आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत (Instagram Post) आली आहे. शिल्पाने एका सकारात्मक विचारासोबत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पेज शेअर करत आपल्या भविष्यकाळाकडे इशारा केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. शिल्पाच्या पतीला जुलैमध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक व्यक्तींनी समोर येत धक्कादायक खुलासे केल्यामुळे हे प्रकरण फारच गंभीर बनलं आहे. तसेच पोलिसांनीही आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या सर्व तणावाच्या वातावरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी एका पुस्तकाचं पान शेअर केलं आहे. (हे वाचा:Sidharth Shukla Duplicate: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणारा तरुण होतोय ....) हे पान शेअर करत त्यामध्ये म्हटलं आहे, 'कोणताही व्यक्ती परत मागे जाऊ शकत नाही. मात्र एक नवी सुरुवात नक्कीच करू शकतो. आत्तापासून सुरुवात करून त्याचा शेवट उत्तम करू शकतो. माणूस आपला मोठ्या प्रमाणात वेळ आपल्या चूका आणि चुकीच्या निर्णयांचा विचार करत वाया घालवतो. खूप तर्कवितर्क लावल्यांनंतर आपल्या लक्षात येत कि आपण चुकीचे निर्णय घेतले होते. आपण समजूतदार स्टो, आपण धैर्यवान असतो तर हे सर्व घडलं नसतं. मात्र कितीही विचार केला तरी आपल्याला मागच्या गोष्टी बदलता येणारच नाही. मात्र इथून पुढे आपण योग्य निर्णय घेत पुढे जाऊ शकतो. चांगल्या लोकांच्यासोबत आपण पुढे जाऊ शकतो'. (हे वाचा:Bigg Boss OTT: आज रंगणार महाअंतिम सोहळा; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार शो) पुढं म्हटलं आहे, 'आपण स्वतः सोबत चांगलं राहू शकतो. वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकतो. आपल्याला हवं तसं आयुष्य आपण घडवू शकतो. आपल्याला आयुष्यात चांगलं आयुष्य घडवण्यासाठी इथून पुढे अनेक संधी येऊ शकतात'. तसेच यामध्ये शेवटी लिहिलं आहे,' मी भूतकाळात काय केलं यावरून माझी पारख होऊ नये. तर मी भविष्यकाळात उत्तम आयुष्याची रचना करू शकते'. शिल्पा शेट्टीची हि पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवत म्हटलं होतं, 'मी माझ्या कामात अतिशय व्यग्र होते. मला नव्हतं माहिती राज कुंद्रा काय करत होते'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Shilpa shetty

    पुढील बातम्या