• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'पतीनंतर आजही स्त्रीला हक्कांसाठी...', 'सुपर डान्सर्स'च्या मंचावर शिल्पाच्या अश्रूंचा फुटला बांध

'पतीनंतर आजही स्त्रीला हक्कांसाठी...', 'सुपर डान्सर्स'च्या मंचावर शिल्पाच्या अश्रूंचा फुटला बांध

यावेळी झांसीची राणीवर आधारीत एक परफॉर्मन्स सादर करण्यात आला. तेव्हा तो डान्स पाहून शिल्पा स्वतःला आवरू शकली नाही.

 • Share this:
  मुंबई 21 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तब्बल महिनाभरानतंर पुन्हा एकदा तिच्या कामावर रुजू झाली आहे. पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेनंतर ती महिनाभर घराबाहेरही दिसली नव्हती. पण आता ती जज करत असलेला रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर्स चॅप्टर 4’ (Super Dancers chapter 4) च्या मंचावर तिने कमबॅक केलं आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाचीही मुंबई क्राईम ब्रँचने चौकशी केली होती. त्यानंतर तिच्यावरही टीका झाली होती. अश्लिल चित्रफिती प्रकरणात राज कुंद्रा अटकेत आहे. त्यामुळे शिल्पालाही मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. दरम्यान उतरलेल्या चेहऱ्याने ती सुपर डान्सर्सच्या मंचावर पोहोचली होती. त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावेळी शोच्या मंचावर तिचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे ती भावुक देखील झाली होती.
  यावेळी झांसीची राणीवर आधारीत एक परफॉर्मन्स सादर करण्यात आला. तेव्हा तो डान्स पाहून शिल्पा स्वतःला आवरू शकली नाही. तिने म्हटलं की, “मी जेव्हा ही लक्ष्मीबाई यांची कथा ऐकते तेव्हा मला समाजाचे प्रतिबिंब दिसून येते. अजूनही एका स्त्रीला तिच्या पती नंतर हक्कासाठी, अस्तित्वासाठी, तिच्या मुलांसाठी लढावे लागते. आणि राणी लक्ष्मीबाई यांची कथा स्त्रियांना प्रेरित करते, लढण्यासाठी शक्ति देते.”
  पुढे ती म्हणाली, “ खरचं  झाशीची राणी एक सुपरवुमन आहेत. मला अभिमान आहे की मी या देशात आहे ज्यात अश्या भयमुक्त महिला आहेत ज्यांनी स्वत:च्या हक्कासाठी लढल्या आहेत. कोणती ही परिस्थिती असो एक स्त्री लढू शकते. ज्या स्त्रिया त्यांच्या अधिकारासाठी लढतात त्यांना माझे शतश: प्रणाम.” त्यामुळे ती भावुक झाली होती.
  Published by:News Digital
  First published: