मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सूपर से उपर : शिल्पा शेट्टीची भन्नाट वर्कआऊट स्टाइल; नेटकरी म्हणले, Fitness असावा तर..

सूपर से उपर : शिल्पा शेट्टीची भन्नाट वर्कआऊट स्टाइल; नेटकरी म्हणले, Fitness असावा तर..

45 वर्षीय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. तिचा आणि तिच्या बहिणीचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

45 वर्षीय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. तिचा आणि तिच्या बहिणीचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

45 वर्षीय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. तिचा आणि तिच्या बहिणीचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: कोरोनाच्या (Coronavirus) संकट काळात अनेक सेलिब्रिटी घरीच व्यायाम करायला पसंती देत आहेत. विविध सेलिब्रिटी आपल्या व्यायामाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) देखील आपले योगा करतानाचे आणि वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ अपलोड करत असते. अनेकदा आपल्या पतीबरोबर किंवा बहिणीबरोबर वर्कआउट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. यावेळी देखील तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये ती आपली बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) बरोबर वर्कआउट करताना दिसून येत आहे. या फोटोत तिने शमिता शेट्टीला उचलून घेतलेलं दिसून येत असून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर चाहत्यांच्या देखील यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून हा वर्कआउटचा फोटो अपलोड केला आहे. यामध्ये ती योगा मॅटवर झोपलेली आहे आणि तिने आपल्या दोन्ही पायांना 90 अंशांच्या कोनात आणून त्यावर शमिता शेट्टीला उचलून घेतलेलं दिसून येत आहे. शमिताचे हात शिल्पाच्या हाता आहेत. शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) ही योगा एक्स्पर्ट असून अनेकदा आपले योगा करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर टाकत असते. या फोटोत 45 वर्षीय अभिनेत्रीने आपल्या 41 वर्षीय बहिणीला सहज उचललेलं दिसून येत आहे. या फोटोला तिने शानदार कॅप्शन देखील दिलं आहे. 'मनातून आपण लहानच आहोत. ही देखील खूप मोठी कला आहे, लक्षात ठेव, लव्ह यू' असे कॅप्शन देत शमिताला देखील टॅग केलं आहे. त्यांनतर शमिताने देखील या फोटोला प्रत्युत्तर देत यावर कमेंट केली आहे. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या अशी कमेंट करत तिने हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळं या दोन बहिणींमधील प्रेमळ केमिस्ट्री देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) सध्या काही चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. जवळपास 13 वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये परतणार असून सध्या तिच्याकडे 2 चित्रपट आहेत. 'निकम्मा' (Nikamma) आणि  'हंगामा 2 (Hungama2) या दोन चित्रपटांमध्ये ती दिसणार असून या चित्रपटांचे शूटिंग सध्या सुरु आहे. निकम्मा या चित्रपटात ती अभिमन्यू दसानी याच्याबरोबर दिसणार आहे. या चित्रपटात ती त्याच्या वहिनीची भूमिका साकारणार आहे. तर हंगामा 2 मध्ये ती परेश रावल (Paresh Rawal) आणि मिजान जाफरी(Mijan Jafree) बरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Shilpa shetty