मुंबई, 09 मार्च : अभिनेत्री शिल्पा शेट्टी 15 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई झाली. महाशिवरात्रीला तिने आपल्या मुलीचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. शिल्पाने हा फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. मात्र आज पहिल्यांदा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीशाबरोबर ती मीडियासमोर आली. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली पण याची कोणाला काही दिवसांसाठी माहिती सुद्धा नव्हती. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सरोगसीद्वारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिला. आज पहिल्यांदा मुलीला सर्वांसमोर आणल्यानंतर शिल्पा खूप आनंदी दिसत होती. मात्र अद्याप तिने तिच्या मुलीचा चेहरा तिच्या चाहत्यांना दाखवला नाही आहे.
शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे. शिल्पाने समीशाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिचं स्वागत केलं आहे. शिल्पाने अचानक आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. समीशाचं बोट पकडल्याचा फोटो शिल्पाने शेअर केला होता.
(हे वाचा-होळीमध्ये अनेक वर्षांपासून याच गाण्यांची धूम, एका क्लिकवर अशी मिळेल Playlist)
त्यामुळे अद्याप समीशा कशी दिसते याची उत्सुकता तिच्या फॅन्सना आहे. चाहत्यांनीही कमेंट्स करत समीशाचं आनंदात स्वागत केलं आहे. 7 वर्षांनंतर शिल्पाने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला आणि तिने समीशाला जन्म दिला.
शिल्पा शेट्टीचा हंगामा 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एकाचवेळी तिने 'हंगामा2' आणि 'निकम्मा' हे चित्रपट साइन केले होते. मात्र आई होणार असल्याचं कळताच तिने या चित्रपटांचं शूटिंग लवकर आटोपलं होतं. हंगामामध्ये शिल्पा शेट्टीबरोबर परेश रावलही दिसणार आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.