19 वर्षानंतर शिल्पा शेट्टीनं उघड केलं 'धडकन'च्या क्लायमॅक्सचं सत्य

19 वर्षानंतर शिल्पा शेट्टीनं उघड केलं 'धडकन'च्या क्लायमॅक्सचं सत्य

सुपर डान्सर सीझन 3 च्या मंचावर शिल्पानं 'धडकन'च्या क्लायमॅक्सविषयी एक मोठा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला 'धडकन' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. 19 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 मध्ये हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता. देव आणि अंजली यांची प्रेमकथा असलेला हा  सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला होता. 'धडकन'ची ही सुपरहिट जोडी शनिवारी (7 एप्रिल) 'सुपर डान्सर' या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर एकत्र आले. त्यावेळी त्यांनी या सिनेमाशी जोडले गेलेले अनेक रोमांचक किस्से शेअर करत 'धडकन'च्या आठवणींना उजाळा दिला. शिल्पानं यावेळी या सिनेमाविषयी अनेक वेगवेगळे खुलासे केले. 'एका क्षणाला हा सिनेमा बनणारच नाही, असंही आम्हाला वाटलं होतं', ही माहितीदेखील शिल्पानं सांगितलं.

शिल्पा म्हणाली, 'देवसाठी सुनील शेट्टी, अंजलीसाठी मी आणि रामसाठी अक्षय कुमारला कास्ट करण्यात आलं होतं. दिग्दर्शक धर्मेश यांना या सिनेमाचं शूटिंग 3 महिन्यात पूर्ण करायचं होतं. मात्र सुनील त्यावेळी दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. म्हणून मग धर्मेश यांनी सुनीलला रिप्लेस केलं. मात्र दुसरा अभिनेता या भूमिकेसाठी सुनील एवढा योग्य वाटत नाही हे समजल्यावर धर्मेशनी हे शूटिंग थांबवून पुन्हा सुनीलला सिनेमात घेण्यात आलं. असं करता करता या सिनेमा शूट व्हायला तब्बल 5 वर्ष गेली.' सुनील शेट्टीला या सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. देव ही भूमिका फक्त सुनीलसाठीच बनली होती असंही शिल्पानं सांगितलं.

सुपर डान्सर सीझन 3 च्या मंचावर शिल्पानं 'धडकन'च्या क्लायमॅक्सविषयीदेखील एक मोठा खुलासा केला. शिल्पानं सांगितलं की, या सिनेमाचा खरा क्लायमॅक्स काही वेगळाच होता पण शेवट गोड करण्यासाठी तो बदलण्यात आला. खऱ्या क्लायमॅक्समध्ये अंजली देवला सांगितलते की, ती रामच्या बाळाची आई होणार आहे आणि त्यामुळे देवचा मृत्यू होतो. पण शेवट गोड करण्यासाठी अंजली रामच्या बाळाची आई होणार हे ऐकल्यावर देव महिमासोबत निघून जातो असं दाखवण्यात आलं.

First published: April 7, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading