मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिल्पा शेट्टीच्या योगा क्लासनं Bigg Boss च्या स्पर्धकांना फुटला घाम, पाहा VIDEO

शिल्पा शेट्टीच्या योगा क्लासनं Bigg Boss च्या स्पर्धकांना फुटला घाम, पाहा VIDEO

शिल्पा शेट्टीनं बिग बॉसच्या घरात कपालभाति, कपल योगा अशा काही योग मुद्रा सदस्यांकडून करुन घेतल्या.

शिल्पा शेट्टीनं बिग बॉसच्या घरात कपालभाति, कपल योगा अशा काही योग मुद्रा सदस्यांकडून करुन घेतल्या.

शिल्पा शेट्टीनं बिग बॉसच्या घरात कपालभाति, कपल योगा अशा काही योग मुद्रा सदस्यांकडून करुन घेतल्या.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 08 फेब्रुवारी : बिग बॉस 13च्या ग्रँड फिनालेसाठी आता अवघा एक आठवडा बाकी आहे. घरात आता अवघे 6 सदस्य उरले असून यातही या आठवड्याच्या नॉमिनेशनपासून आसिम रियाज सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मि देसाई सुरक्षित आहेत. पण आता फिनालेचा जोश सर्व स्पर्धकांमध्ये दिसून येत आहे. आज प्रसारित होणारा विकेंट का वार हा या सीझनमधील शेवटचा विकेंड का वार असणार आहे. ज्यात स्वतः सलमान खान चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. यासोबत आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये तिनं घेतलेल्या योगा क्लासमध्ये घरातल्या सर्व स्पर्धकांना घाम फुटल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस 13च्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवर नुकताच एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात शिल्पा शेट्टी बिग बॉसच्या घरात एंट्री करताना दिसत आहे. खरंतर शिल्पा बिग बॉसच्या घरात तिचा आगामी सिनेमा निकम्माच्या प्रमोशनसाठी आली आहे. पण सिनेमाच्या प्रमोशनसोबतच शिल्पानं घरातील सदस्यांचा योगा क्लाससुद्धा घेतला. पण शिल्पाकडून योग शिकता शिकता घरातल्या सदस्यांना घाम फुटला. नेहा-आदित्यच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट VIRAL
शिल्पा शेट्टीनं बिग बॉसच्या घरात कपालभाति, कपल योगा अशा काही योग मुद्रा सदस्यांकडून करुन घेतल्या. पण घरातल्या सदस्यांनी ज्याप्रकारे हे योगा केले ते पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. घरातल्या एकाही सदस्याला व्यवस्थित योगा करता आलेला नाही. या सर्वांच्या योग मुद्रा पाहिल्यावर स्वतः शिल्पा शेट्टीलाही हसू आवरेनासं झालं आहे. अभिनेत्री हिना खानला त्रास देत असे अनोळखी तरूण, व्हिडीओ पाठवून म्हणायचा...
निकम्मा सिनेमातून शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. शब्बीर खानचं दिग्दर्शन असणारा हा सिनेमा 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाच्या चाहत्यांना तिच्या पुनरागमनाची खूप उत्सुकता आहे. शिल्पानं तिच्या मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूड सिनेमांतून ब्रेक घेतला होता. पण आता तिनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. ‘निकम्मा’मध्ये शिल्पा शेट्टीसोबतच अभिमन्यू दसानी, शिर्ले सेटिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...
First published:

Tags: Bigg boss, Bollywood, Shilpa shetty

पुढील बातम्या