वाऱ्याचा वेग वाढला आणि शिल्पा शेट्टीची झाली फजिती, शेअर केला VIDEO

वाऱ्यामुळे उडाला शिल्पा शेट्टीचा ड्रेस, सोशल मीडियावर अशी सांगितली फजिती.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 12:32 PM IST

वाऱ्याचा वेग वाढला आणि शिल्पा शेट्टीची झाली फजिती, शेअर केला VIDEO

मुंबई, 26 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सिनेमापासून दूर असली तरीही कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतेच. सध्या शिल्पा चर्चेत आली आहे ती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे आणि हा व्हिडिओ शिल्पानं स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रिवीलिंग ड्रेस आणि तुफान वारा यामुळे शिल्पाला लाजिरवण्या क्षणाचा सामना करावा लागला. शिल्पा रिवीलिंग ड्रेसमध्ये एका बोटवर सिझलिंग पोझ देत होती आणि अचानक वाऱ्याच्या वेग वाढला आणि शिल्पाला उप्स मूव्हमेंटचा सामना करावा लागला. शिल्पानं कसं तरी आपला ड्रेस संभाळला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या कुटुंबासोबत युरोप मध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरशेअर केले आहेत. यातील एक व्हिडिओ यामध्ये शिल्पा क्रूझवर उभी राहून पोझ देताना दिसत आहे. हा स्लो मोशन व्हिडिओ असून शिल्पा हात वर करून एंजॉय करत असताना वाऱ्याचा वेग वाढतो आणि शिल्पाचा ड्रेस वर उडतो. पण शिल्पा लगेच ड्रेस सावरते आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शाहरुखच्या मुलासोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

Loading...

 

View this post on Instagram

 

Enjoyed every bit of this shoot, every picture is a story in itself, replete with stunning visuals from the @samujanavillas and the gorgeous weather in Koh Samui❤ Every look, every outfit, every element you see me donning for the @globalspa_mag has been carefully curated by the wonderful teams that worked with so much love... to make this happen. (Tap on the images for the details) Courtesy: @tat.india Styled by: @chandanizatakia and @mohitrai Styling Assistant: @tarangagarwal_official Makeup: @ajayshelarmakeupartist Hair: @sheetal_f_khan Photographer: @vikram_bawa Managed by: @bethetribe Reputation Management: @media.raindrop Videographer: Nikhil Radhayaksha #AgelessIssue #GlobalSpa #GlobalSpaMagazine #Wellness #GlobalSpaJulyAugIssue #GlobalSpaWellnessDiva

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

शिल्पानं हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, क्रूझवर माझी मर्लिन मुनरो मोमेंट कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. शिल्पाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तिनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या ड्रेसमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत आहे.

अमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती डान्स रियलिटी शो सुपर डान्सरमध्ये परिक्षक म्हणून दिसली आहे. याशिवाय ती लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करेल अशी चर्चा आहे. तिनं एका बिग बजेट सिनेमाला होकार दिल्याचंही बोललं जात आहे. असं झालं तर जवळपास 12 वर्षांनी बॉलिवूडमध्ये वापसी करेल.

अमृता खानविलकरने शेअर केले हॉट फोटो, या कारणासाठी आहे चर्चेत

=========================================================

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...