सुनील आणि शिल्पा शेट्टीने जागवल्या ‘धडकन’च्या आठवणी; VIDEO ठरला हिट

सुनील आणि शिल्पा शेट्टीने जागवल्या ‘धडकन’च्या आठवणी; VIDEO ठरला हिट

सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी ने 'धडकन' चित्रपटातील 'तेरी यादो मे' गाण्यावर एवढ्या वर्षांनंतर सुंदर परफॉर्मन्स सादर केला आहे. पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई 29 मे : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांचा 2000 साली आलेल्या ‘धडकन’ (Dhadkan) चित्रटाने साऱ्यांनाच वेड लावलं होत. चित्रपट सुपरहीट ठरला होता. तर ही जोडी आजही प्रेक्षकांना तितकीच आवडते. शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी याच जुन्या आठवणींना उजाळा देत एक परफॉर्मन्स सादर केला आहे.

शिल्पा सध्या सोनी टिव्ही (Sony Tv) वरील ‘सुपर डान्सर्स’ (Super Dancers) या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. अनेक दिवसानंतर ती कार्यक्रमात परतली आहे. यावेळी अभिनेता सुनिल शेट्टीने देखिल या शो मध्ये विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी दोघांनीही त्यांच्या सुपरहीट ‘धडकन’ चित्रपटातील गाण्यावर परफॉर्मन्स दिला. ‘मेरी यादो मे’ या एव्हरग्रीन गाण्यावर त्या दोंघानीही परफॉर्मन्स सादर केला. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षाकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

अनेक वर्षांनंतर या हीट चित्रपटाच्या गाण्यावर दोघांनीही केलेल्या सादरीकरणामुळे त्यांच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर काहीच तासांत या व्हिडीओला लाखो व्हूज देखिल मिळाले आहेत. शिल्पा आणि सुनिल दोघेही आता चित्रपटांत दिसत नाही. पण त्यांचा अजूनही मोठा चाहता वर्ग आहे.

अबब... इतक्या पैशांत एखादं घर येईल; प्रियांकाच्या ड्रेसची किंमत ऐकून येईल चक्कर

शिल्पाने पिवळ्या रंगाचा सुंदर ट्रेडीशनल सुट परिधान केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. शिल्पाने आपल्या कामातून म्हणजेच ‘सुपर डान्सर्स’च्या मंचावरून काही दिवस ब्रेक घेतला होता. शिल्पाचं संपूर्ण कुटुंब हे काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. अगदी तिची लहान 2 वर्षांची मुलगी देखिल कोरोना पॉझिटीव्ह आली होती. तर आता संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त झालं आहे. त्यामुळे शिल्पाने पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

याशिवाय शिल्पा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्य मुलांसोबत, पतीसोबत मजेशीर व्हिडीओड , फोटोज ती शेअर करत असते.

Published by: News Digital
First published: May 29, 2021, 6:10 AM IST

ताज्या बातम्या