मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shilpa Shetty: व्हॅनिटी व्हॅननंतर शिल्पा शेट्टीची नवी मर्सिडीज चर्चेत; किंमत वाचून बसेल धक्का

Shilpa Shetty: व्हॅनिटी व्हॅननंतर शिल्पा शेट्टीची नवी मर्सिडीज चर्चेत; किंमत वाचून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर आपल्या लग्जरी लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर आपल्या लग्जरी लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर आपल्या लग्जरी लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर आपल्या लग्जरी लाईफस्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असते. सध्या शिल्पा शेट्टी आपल्या नव्या मर्सिडीज-एएमजी जी63 या आलिशान कारमुळे चर्चेत आली आहे.नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मर्सिडीज-एएमजी जी63 एसयूव्हीमध्ये दिसून आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या SUV कारची किंमत जवळपास 2.28 कोटी रुपये आहे. ही कार शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राची असल्याची म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही रोज सोनेरी रंगाच्या मर्सिडीज-एएमजी जी63 मधून कुठेतरी जाताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीने तिच्या नवीन लग्झरी व्हॅनिटी व्हॅनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हॅनिटी व्हॅन शिल्पा शेट्टीने तिच्या वाढदिवशी खरेदी केली होती.त्यानंतर आता अभिनेत्री या मर्सिडीजमुळे चर्चेत आली आहे. CS 12 युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री खऱ्या आयुष्यात जितकी सक्रिय आहे तितकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. शिल्पा सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबाबत प्रत्येक अपडेट देत असते. मग ते फिटनेस टिप्स असो, व्यावसायिक गोष्ट असो, तिच्या घरचे फंक्शन असो किंवा तिने खरेदी केलेली कोणतीही नवी वस्तू असो. शिल्पा आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात चाहत्यांना सहभागी करत असते.

शिल्पा शेट्टीने आज पर्यंत आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फिटनेसच्या जोरावर चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. तिचा अफाट चाहतावर्ग आहे. दर्या आता अभिनेत्री नव्या प्लॅटफॉर्म भेटीला येणार आहे. शिल्पा शेट्टी लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.या सीरिजची घोषणा झाल्यापासूनच चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

" isDesktop="true" id="764878" >

(हे वाचा:Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नपत्रिकेने वेधलंय लक्ष; 'या' गोष्टीवरुन मिळाली हटके आयडिया )

शिल्पा शेट्टी आपल्या कामाच्या बाबतीत प्रचंड सक्रिय असते. ती प्रत्येक गोष्टीत आपली पूर्ण ताकत लावत असते. नुकतंच या सीरिजच्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. याबाबतचा एक फोटो शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, "6 आठवडे विश्रांती घेईन, परंतु मी लवकरच पुन्हा मजबूत आणि चांगली होईन. तोपर्यंत प्रार्थना करा. प्रार्थना नेहमी कामी येते. कृतज्ञतापूर्वक, शिल्पा शेट्टी कुंद्रा."शिल्पा शेट्टीची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली होती.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Shilpa shetty