राज कुंद्राने तक्रारदाराला 100 कोटीसाठी धमकावलं, कोर्टाने खडसावलं

राज कुंद्राने तक्रारदाराला 100 कोटीसाठी धमकावलं, कोर्टाने खडसावलं

अपहार प्रकरणी तक्रारदाराला 100 कोटी तयार ठेवं अशी धमकी राज कुंद्रानं दिल्याचं तक्रारदाराच्या वकिलांनी म्हटलंय

  • Share this:

19 मे : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा आता आणखी अडचणीत सापडले आहे. कारण तक्रारदाराला धमकावल्याप्रकरणी त्याला कोर्टाने माफीनाम्यासह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अपहार प्रकरणी तक्रारदार रवी भालोरिया यांना 100 कोटी तयार ठेवं अशी धमकी राज कुंद्रानं दिल्याचं तक्रारदाराच्या वकिलांनी म्हटलंय. वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर कोर्टाने राज कुंद्राला लेखी हमीपत्र आणि माफीनामा सादर करत उद्या (शनिवारी) कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. ऑनलाईन शॉपिंग प्रकरणी फसवणूक केल्याचा राज कुंद्रावर गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण ?

भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीमध्ये अलेशिया एक्स्पोर्ट कंपनी आहे. या कंपनीतून ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागवण्यात आलेल्या बेडशिट्स ऑनलाईन कंपन्यांना पुरवण्यात येतात.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बेस्ट डिल टीव्ही या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या बेडशीट्स पुरवूनही या कंपनीला तिचे पैसे मिळाले नाहीत.

त्यामुळे कंपनीच्या मालकाने शिल्पा आणि राजच्या विरोधात 24 लाख 12 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहेत. हा प्रकार जुलै 2015 ते  मार्च 2016 आणि जुलै 2016 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत घडलाय.

First published: May 19, 2017, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading