मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसनं सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या सर्वांच्या सेवेसाठी सध्या देशातील डॉक्टर्स अहोरात्र झटताना दिसत आहेत. अनेकांना त कित्येक दिवस आपल्या घरी जाता आलेलं नाही. तसेच अशा रुग्णांवर उपचार करत असताना या व्हायरसचा आपल्यालाही धोका आहे हे माहित असूनही कोणतीही तक्रार न करता हे नर्स आणि डॉक्टर्स रुग्णाची सेवा करताना दिसत आहेत. अशात एका अभिनेत्रीनं अभिनयाला रामराम करत नर्स होऊन रुग्णाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे.
या अभिनेत्रीचं नाव आहे शिखा मल्होत्रा. कांचली या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीनं या क्षेत्रात येण्याआधी वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये 2014 मध्ये नर्सिंग कोर्स पूर्ण केला होता. मात्र अभिनयासाठी तिनं नर्सिंगचं करिअर अर्धवट सोडलं. पण आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता वॉलेंटिअर नर्स म्हणून शिखानं रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Lockdown मध्ये एकमेकांना वेळ देत आहेत रणबीर-आलिया, VIDEO व्हायरल
शिखाला तिच्या या कामासाठी बीएमसीकडून परवानगी देण्यात आली असून सध्या ती मुंबई जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये वॉलेंटिअर नर्स म्हणून काम पाहत आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करतानाचे शिखाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या या कामाचं खूप कौतुक केलं जात आहे.
‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान
शिखानं तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं, कॉलेजमध्ये मी नर्सिंग कोर्स केल्यानंतर समाजसेवा करण्याचा संकल्प केला होता. मला वाटतं आज ती वेळ आली आहे. शिखाच्या या निर्णयाचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. याशिवाय अनेक बॉलिवूड आणि साउथ सेलिब्रेटींनी या रुग्णसाठी करोडो रुपये दान केले आहेत ज्यात अक्षय कुमारचं योगदान सर्वाधक आहे. त्यानं 25 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीला दान केले आहेत.
श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood