Home /News /entertainment /

Shikara Trailer : काश्मिरी पंडितांवरचा अन्याय पाहून आवरणार नाही अश्रू

Shikara Trailer : काश्मिरी पंडितांवरचा अन्याय पाहून आवरणार नाही अश्रू

हा ट्रेलर एवढा इमेशनल आहे की तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

    मुंबई, 07 जानेवारी : भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत काश्मीर हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं हे राज्य सिनेमात जसं सुंदर दाखवलं जातं तसं अजिबात नाही. तिथंल प्रत्यक्ष वास्तव कैक पटींनी भीषण आहे. बहुसंख्य जनता ही मुस्लिम धर्मीय असल्यानं तिथल्या पंडितांवर आता पर्यंत अनेकदा अन्याय झाले आहे. मात्र या मुद्द्यावर फार कमी वेळी बोललं जातं. धगधगत्या काश्मीरमधलं हे भीषण वास्तव दिग्दर्शनक विंदू विनोद चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांवर आधारित असलेल्या शिकारा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात काश्मीरमधलं वास्तव जीवन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा ट्रेलर एवढा इमेशनल आहे की तो पाहिल्यावर तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. पांड्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूची अभिनेत्रीनं घेतली विकेट, लवकरच करणार लग्न? ही कथा आहे 1990 मधली. ज्यावेळी 4 लाखांपेक्षा जास्त काश्मिरी पंडितांना आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं होतं. जे जवळपास 3 दशकांनंतरही आपल्या घरांमध्ये परत जाऊ शकलेले नाहीत. आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगण्यापेक्षा दुसरं मोठं दुःख ते काय असावं? ‘शिकारा’ ही 30 वर्षांच्या वनवासात अनिर्णित राहिलेही प्रेमकथा आहे. हा ट्रेलर पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणतो. शिकारा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडित अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन विंदू विनोद चोप्रा यांनी केलं आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अभिनेता आदिल खान आणि अभिनेत्री सादिया खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. पण याच दिवशी दिशा पाटनी-आदित्य रॉय कपूर यांचा मलंग हा सिनेमाही रिलीज होत असल्यानं कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो याची उत्सुकता कायम आहे. Birthday Special : बिपाशा बासूचे 'हे' 30 दुर्मिळ फोटो, तुम्ही कधीच पाहिले नसतील JNU हल्ला निषेध : मुंबईत विशाल भारद्वाजने सादर केली कविता, VIDEO VIRAL
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या