शिबानी-फरहानचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शिबानी-फरहानचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे वर्ष अनेक अफेअर्सनीही गाजलंय. फरहान अख्तर आणि शिबानी यांच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : 2018 संपायला काही तास उरलेत. हे वर्ष अनेक अफेअर्सनीही गाजलंय. फरहान अख्तर आणि शिबानी यांच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा झाली.

हे वर्ष संपता संपता शिबानीनं आपल्या फॅन्सना एक भेट दिलीय. ती म्हणजे फरहानसोबतचा तिचा फोटो. तो खूप व्हायरल झालाय. त्यात फरहान कॅज्युअल ड्रेसमध्ये आहे, तर शिबानीनं काळ्या रंगाचा स्टाइलिश ड्रेस घातलाय. या फोटोखाली कसलीच कॅप्शन नाही. फरहानसोबत टॅग मात्र केलंय.

View this post on Instagram

✨ @faroutakhtar ✨

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on


शिबानीनं फरहानबरोबरचे अनेक फोटोज आतापर्यंत शेअर केलेत. मागे एका मुलाखतीत ती म्हणाली, 'मी कोणाला डेट करतेय हे लोकांना कळणं काही गरजेचं नाहीय. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाला सांगावं की नाही, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याला मी जबाबदार नाही.'

काही दिवसांपूर्वी शाबानीनं इन्स्ट्रावर आपला एक फोटो टाकला होता. त्यात मिस्ट्री मॅन असा उल्लेख केला होता. तेव्हाही तो फरहान असल्याचं अनेकांनी ओळखलं. तोच फोटो फरहाननं पोस्ट केला होता. त्याखाली काहीही न लिहिता फक्त हार्ट पोस्ट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर मोहोर उमटली.

Loading...

2016मध्ये फरहान आणि अधुना यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि शिबानी हे दोघे २०१५पासून एकमेकांना ओळखतात.त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय. शिबानी ही प्रसिद्ध वीजे आणि अँकर अनुषा दांडेकरची बहीण आहे.

अधुना तिच्या घटस्फोटानंतर डिनो मोरीयाचा भाऊ निकोल मोरीयासोबत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तर श्रद्धा आणि फरहान विभक्त झाल्यानंतर श्रद्धा एका फोटोग्राफरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. भावेश जोशी या चित्रपटात शिबानीने अर्जुन कपूरसोबत एक आयटम नंबर केला आहे. याशिवाय तिनं एका संघर्ष या मराठी सिनेमातही आयटम नंबर केला होता.


'Bigg Boss 12'ची विजेती दीपिकानं इस्लाम धर्म स्वीकारला, आता तिचं नाव आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...