Home /News /entertainment /

Shershaah first look रिलीज, सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट

Shershaah first look रिलीज, सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट

या सिनेमात सिद्धार्थ आर्मी कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारत आहे.

  मुंबई, 16 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासाठी आजचा दिवसा खूप खास आहे. सिद्धार्थ आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि याच दिवशी त्याला एक खास गिफ्ट मिळालं आहे. त्याचा आगामी सिनेमा शेरशाहचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला. या सिनेमात सिद्धार्थ आर्मी कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारत आहे. निर्माता करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. सिद्धार्थनं हे पोस्टर शेअर करत कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं लिहिलं शौर्य आणि हौतात्म्याच्या वेगवेगळ्या रंगांना मोठ्या पडद्यावर साकारणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवन यात्रेला माझी श्रद्धांजली. त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
  कोण आहेत कॅप्टन विक्रम बत्रा 'शेरशाह'मध्ये 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील वीर जवान कॅप्टन विक्रम बत्रा यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमात विक्रम बत्रा आणि त्यांचा भाऊ विशाल बत्रा यांच्या डबल रोलमध्ये दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणी या सिनेमात विक्रम बात्रा याची होणारी पत्नी डिंपल चीमा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विष्णू वर्धन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘शेरशाह’ येत्या 3 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची निर्मिती करण जौहर, हीरू जौहर, अपूर्वा मेहता, शब्बीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशु गांधी यांनी केली आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या व्यतिरिक्त जावेद जाफरी, हिमांशु मल्होत्रा आणि परेश रावल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Siddharth malhotra

  पुढील बातम्या