सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1999मध्ये कारगिल युद्धाचे ते हिरो होते. या चित्रपटातून विक्रम बत्रा याचं युद्धातील योगदान आणि त्यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. विक्रम बत्रा हे डिंपल चिमा या आपल्या कॉलेजमध्येसोबत शिकणाऱ्या मैत्रिणीच्या प्रेमात होते. तीसुद्धा त्यांच्यावर तितकचं प्रेम करत होती. त्यांच्या प्रेमाची खरी ताकत म्हणजे त्यांनी विक्रम शहिद झाल्यानंतर अजूनही इतर कोणाशीचं लग्न केलं नाही. त्या विक्रम यांच्या आठवणीच्या आधारे आपलं आयुष्य जगत आहेत. अशी ही अभिमानास्पद कथा यातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाला मोठं यश मिळालं आहे. याचं यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सिद्धार्थ आणि कियारा कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी चित्रपटाचे अनेक अभिनय सांगितले सोबत धम्मालही केली आहे. (हे वाचा: सिद्धार्थच्या जाण्याने असिमला सावरणं कठीण; गर्लफ्रेंड हिमांशीने सांगितली अवस्था ) तसेच यावेळी सिद्धार्थने एक किस्सा शेयर करत सांगितलं, ‘आम्ही 1200 फुट उंचावर शुटींग करत होतो. यावेळी आम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. मात्र खर कारगिल युद्ध 16000 फुट उंचावर झालं होतं. त्या वास्तविक युद्धासमोर आमचं शुटींग काहीच नव्हत. विक्रम बत्रा हे आपले रियल हिरो आहेत. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला त्यांची भूमिका साकारायची संधी मिळाली’. तर दुसरीकडे कपिल शर्माने कियाराचंदेखील कौतुक केलं, ती एक पंजाबी गर्ल नसूनदेखील तिने चित्रपटात उत्तम पंजाबी बोलली आहे. त्यामुळे कपिलने तिचं कौतुक केलं. यावेळी कियाराने डिंपल चिमासोबतचा भावनात्मक अनुभवदेखील शेयर केला आहेView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kiara advani, Sidharth Malhotra