मुंबई 27 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. (Raj Kundra Pornograpgy case) त्यामुळे राजच्या व्यवसायांविरोधात सतत विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिची देखील चौकशी केली जाणार आहे. तिने राजवर पॉर्नोग्राफी संबंधीत गंभीर आरोप केले होते. त्यामुळे क्राईम ब्रांचने (Crime Branch) तिला देखील समन्स पाठवलं आहे.
‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती
शर्लिनने राजसोबत जवळपास 15 ते 20 पॉर्न आणि सेमी पॉर्न प्रोजेक्ट केले आहेत. प्रत्येक प्रोजेक्टसाठी तिने 30 लाख रुपयांचा करार केला होता. परंतु काही चित्रपटानंतर त्याने पैसे देण्यास आढेवेढे केले. त्यामुळे शर्लिनने राजसोबत काम करण्यास नवकार दिला. इतकेच नाही तर तिने या प्रकरणी पोलीस तक्रार देखील केली होती. राजने तिची तिची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार तिने केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर काहीच दिवसात अशीच तक्रार अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील केली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शर्लिनची चौकशी केली जाणार आहे.
Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी
राजसोबत व्यवसायिक संबंध तोडल्यानंतर शर्लिनने स्वत:ची वेब साईट सुरु केली. त्यावर ती पॉर्नोग्राफी करत होती. परंतु त्यावर देखील काही दिवसांतच बंदी घालण्यात आली. शिवाय तिचा कंटेंड पायरेडेट होत असल्यामुळे तिने सायबर पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. अन् ही पायरसी राज कुंद्राच करत असल्याचा आरोप देखील तिने केला होता. या आरोपांवर अद्याप राजने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.