मुंबई 8 ऑगस्ट : अश्लिल चित्रफिती (Pornography) प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचची चौकशी सुरू आहे. अनेकांची नावं यात पुढे येत आहेत. तसेच काही अभिनेत्रींची चौकशी केली जात आहे. शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) जवळपास 8 तास कसून चौकशी केली. यानंतर शर्लिन मीडियाशी बोलली, तेव्हा राखी सावंतचा तिने समाचार घेतला. तर तिच्या वक्तव्यांवरही टीका केली.
पॉर्नोग्राफी प्रकरणात अनेक मॉडेल्स, अभिनेत्रींची नाव समोर आली. त्यावर राखीने म्हटलं होतं की, ‘जसं विकाल तशीच ऑफर मिळणार’. यावर शर्लिन तिच्यावर फारच संतापली आहे. तिने म्हटलं आहे की, राखीला या मुद्द्यावर कमेंट करण्याचा कोणताच अधिकार नाही.
Big Boss OTT : हा प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता झळकणार बिग बॉसच्या घरात; घटस्फोटाचं कारण सांगणार?
आज तकच्या वृत्तानुसार शर्लिनने म्हटलं की, “राखी तू एक चांगली डान्सर आहेस, कॉमेडियन आणि कलाकार आहे, पण या मुद्दय्वर कोणतीच कमेंट करू नको, कारण याच्याशी तुझं काहीच घेणं देणं नाही. जर आहे तर पुढे येऊन बोल. आणि जर नाहीये तर मुलींवरून असं बोलू नके की त्या पब्लिसीटीसाठी खोटं बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यांना खोटं नको ठरवू.” राखीला अनेकदा यावर प्रश्न विचारले गेले तेव्हा ती राज कुंद्राचं समर्थन करताना दिसली.
शर्लिनने पुढे सांगितलं की, शर्लिनने राखीची नक्कल करत म्हटलं की, ‘माहीत नाही कुठून येतात आणि कॅमेऱ्यासमोर बोलू लागतात.’ ‘राज कुंद्राने मला का नाही बोलवलं.’ “नशीब समज तुला नाही बोलावलं, नाहीतर या प्रकरणात अडकली असती मूर्ख मुलगी.” शर्लिनने खुलासा केला की पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी, राज कुंद्राने तिची दिशाभूल केली.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सर्वात आधी या प्रकरणात केस नोंदवण्यात आली होती. त्यावेळी शर्लिननेही तिचा जवाब नोंदवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी आता शर्लिनची चौकशी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.