मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर शर्लिन चोप्राने केले खळबळजनक आरोप;पोलिसांत दाखल केली तक्रार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर शर्लिन चोप्राने केले खळबळजनक आरोप;पोलिसांत दाखल केली तक्रार

 शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार(FIR) केली आहे

शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार(FIR) केली आहे

शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार(FIR) केली आहे

मुंबई, 16ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra Pornography Case) पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिनेत्री शर्लिन चोप्राचादेखील जबाब नोंदवला होता. त्यावेळी शर्लिनने ऑनलाईन पॉर्न बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप केला होता. त्यांनतर आता शर्लिन चोप्राने(Sherlyn Chopra) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात पोलिसात तक्रार(FIR) केली आहे. शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शर्लिन चोप्रा तिच्या लिगल टीमसह जुहू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती, तिथे तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खुलासा करत म्हटलं आहे, 'राज कुंद्राने तिचं फक्त शोषणच केलं नाही तर अंडरवर्ल्डची धमकीसुद्धा दिली आहे'.

एका कॉन्फरन्सदरम्यान ती म्हणाली की, 'तुम्ही मुलींना त्यांचं अंगप्रदर्शन करण्याचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्याला टोपी का घालता?' शर्लिन इथेच थांबली नाही, ती पुढे म्हणाली, 'हा नैतिक व्यवसाय आहे का? तुम्हाला व्यापारी व्हायचे आहे, टाटा व्यवसाय कसा करतात ते शिका. नैतिकतेसह, आपण जे वचन देता ते पाळता आणि आपण काय करता? तुम्ही कलाकाराच्या घरी जाऊन त्यांचे लैंगिक शोषण करता. तो त्याच्या घरी जातो आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतो. ते म्हणतात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल'.

(हे वाचा:Raj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने ... )

शर्लिन चोप्राने पुढं खुलासा करत म्हटलं, की 'ती 20 एप्रिल 2021 रोजी जुहू पोलिस स्टेशनमध्ये राज कुंद्राविरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी हजरसुद्धा झाली होती. तसेचराज कुंद्रावर आणखी आरोप करत शर्लिन म्हणाली की, 27 मार्च 2019 रोजी कुंद्रा रात्री उशिरा तिच्या घरी आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले होते'. ती पुढं म्हणालीकी, २मार्च रोजी तिने कुंद्राच्या दबावाखाली फोटोशूट केलं होतं . त्यानंतर शर्लिनने आरोप केला की पुढील 10 महिने राज कुंद्रा तिच्या इतर फर्म जेएल स्ट्रीममध्ये सामील होण्यासाठी मागे लागला होता. आणि तिला फिटनेससंबंधित सामग्री अपलोड करण्यासदेखील सांगितलं होतं'.

शर्लिनने यापूर्वीही आरोप केला होता की राज कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केल होतं. शर्लिन म्हणाली होती की तिने राज कुंद्राला मागे ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजनं ऐकलं नाही आणि ती तिथून घाबरून पळून गेली.

First published:

Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty