मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तुला साष्टांग दंडवत', राज कुंद्रावरून ट्रोल करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता शिल्पा शेट्टीसमोर जोडले हात

'तुला साष्टांग दंडवत', राज कुंद्रावरून ट्रोल करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता शिल्पा शेट्टीसमोर जोडले हात

अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) खिल्ली उडवली आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) खिल्ली उडवली आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) खिल्ली उडवली आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर ; बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी (Pornography Case) प्रकरणात जवळपास दोन महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. राज कुंद्राला जामीन मिळाल्यापासून अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) शिल्पा शेट्टीवर वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधत आहे. शर्लिनने या प्रकरणावरून शिल्पावर यापूर्वी देखील अनेकवेळा टीका केली आहे. शर्लिनने मंगळवारी पुन्हा एकदा ट्विट करत शिल्पावर टीकेची झोड उठवली आहे. तिच्या फिलॉस्फीची खिल्ली उडवत तिला साष्टांग दंडवत घातला आहे.

शिल्पाबाबत एका ट्विटर युझरने ट्विट केलं आहे.  "मी राज कुंद्रा आहे का? मी त्याच्यासारखी दिसते का? मी कोण आहे?" या शिल्पा शेट्टीच्या वक्तव्याचा त्यात उल्लेख आहे. यावर शर्लिनने रिट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शर्लिन चोप्रा म्हणाली, 'दीदीला तिच्या नवरदेवाच्या कृत्यांचा कसलाच पश्चाताप होत नाही, असंच दिसत आहे! तू नेहमी म्हणतेस, एक सेलिब्रिटी म्हणून कधीच कोणत्या गोष्टींची तक्रार करू नये तसंच कधी स्पष्टीकरण देऊ नये. मस्त आहे तुझे तत्त्वज्ञान ! यासाठी तुला साष्टांग दंडवत तर घालावच लागेल"

हे वाचा - आदिराजला विसरून मीरा निखिलशी लग्न करणार?; Ajunhi Barsat Ahe मध्ये नवा ट्विस्ट

शर्लिन चोप्राने शिल्पावर केलेल्या आरोपचे अभिनेत्री गहना वशिष्ठने वारंवार खंडण केले आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी शर्लिन हे करत असल्याचे गहनाने म्हटले आहे. शर्लिन हे केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी करत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासून शर्लिनने राज कुंद्रावर अनेक आरोप केले आहेत. तसंच शर्लिनकडे कसलंच काम नसल्याने ती हे सगळं करत असल्याचं गहना म्हणाली.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Raj kundra, Shilpa shetty