ख्रिस गेलच्या एक्स गर्लफ्रेंडला बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक पाठवायचा अश्लील मेसेज

ख्रिस गेलच्या एक्स गर्लफ्रेंडला बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक पाठवायचा अश्लील मेसेज

या अभिनेत्रीनं प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राम गोपाल वर्मानं सिनेमाच्या नावाखाली मला त्रास होईल असं वर्तन केल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी याआधी आवाज उठवला होता. त्यानंतर आता वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटपटूची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रानं सुद्धा याबात एक धक्कादायक खुलासा केला आहे. शर्लिन चोप्रानं फिल्म मेकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मावर कास्टिंग काउच संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राम गोपाल वर्मानं सिनेमाच्या नावाखाली मला त्रास होईल असं वर्तन केल्याचं शर्लिननं म्हटलं आहे.

शर्लिन म्हणाली, '2016मध्ये मी राम गोपाल वर्माला माझ्या काही फोटोंचं प्रोफाइल पाठवलं होतं. मी त्यांना ते सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहेत हे विचारलं होतं तसेच मी त्यांच्याशी काम करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. मी त्यांना हे सुद्धा सांगितलं होतं की, 'सत्या', 'कंपनी' यासारखे त्यांचे सिनेमे पाहिल्यावर त्यांची चाहती झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणत्यातरी प्रोजेक्टवर काम करायचं आहे असं सांगितलं होतं.'

डोली लेके आना...! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला दबंग सलमानसोबत करायचंय लग्न

शर्लिन पुढे म्हणाली, 'राम गोपाल वर्मा यांनी मला एक स्क्रिप्ट पाठवली होती आणि ती पाहून त्यावर माझी प्रतिक्रिया द्यायला त्यांनी सांगितलं होतं. मी त्यांचा मेल पाहिला, त्यात सिनेमाच्या कथेच्या जागी एक अश्लील व्हिडीओ होता. मी त्यांना विचारलं सर हा तर एक अश्लील सीन आहे. त्यावर ते मला म्हणाले, जर तुझी संमती असेल तर आपण पुढे जाऊ शकतो.' शर्लिननं हा खुलासा तिचं लेटेस्ट गाणं कतारच्या प्रमोशन दरम्यान केली. शर्लिनचं म्हणणं आहे की, राम गोपाल वर्मा यांनी तिला एक अडल्ट सिनेमा ऑफर केला होता.

'बहोत हार्ड'ची हॉट Tik Tok स्टार आता करणार Bigg Boss 13 मध्ये एंट्री?

 

View this post on Instagram

 

Happy #bakrid ❤️

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

 

View this post on Instagram

 

I like who I AM becoming. A lot. 🔥🔥🔥 #nononsensebabe #bosslady 👑👑👑

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर शर्लिननं 2017 मध्ये 'माया' या शॉर्टफिल्ममध्ये शेवटचं काम केलं होतं. तिनं आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात 2002 मध्ये केली होती. तिच्या आतापर्यंतच्या करिअरच्या काळात ती 'बिग बॉस-3' आणि 'MTV Splitsvilla 6' या टीव्ही शोमध्येही सहभागी झाली होती. याशिवाय काही वर्षांपूर्वी IPL दरम्यान तिचं नाव वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलसोबत तिचं नाव जोडलं गेल्यानं ती चर्चेत आली होती.

अर्जुन कपूर लागला कॅटरिनाच्या मागे; या फोटोवरून केलं ट्रोल

=====================================================================

SPECIAL REPORT: पिंपरी चिंचवड पालिकेचा जक्कास उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या