S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

सलमानचा बॉडीगार्ड शेरावर महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप

हेल्प केअर फाउंडेशनच्या डायरेक्टर शबनम यांनी शेरावर आरोप केला आहे.शेराने शबनम यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बिग बॉसचे पूर्व स्पर्धक जुबेरला मदत केल्यामुळे शबनमला शेराने धमकी दिली असा आरोप शेरावर करण्यात आला आहे. जुबैर खानला सलमान खान कुत्ता म्हणाला होता.तसंच त्याने जुबैरला धमकावलंही होतं. त्यानंतर जुबैर खान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता.बाहेर आल्यावर त्याने सलमानला खुलं आव्हान दिलं आहे. याच जुबैर खानची जवळची मैत्रीण शबनम शेख आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 04:26 PM IST

सलमानचा बॉडीगार्ड शेरावर महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप

21 ऑक्टोबर: सलामान खानच्या बॉडीगार्ड शेरावर एका महिलेने शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच शेराने या महिलेला धमक्या दिल्याचाही आरोप या महिलेने केला आहे.

हेल्प केअर फाउंडेशनच्या डायरेक्टर शबनम यांनी शेरावर आरोप केला आहे.शेराने शबनम यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बिग बॉसचे पूर्व स्पर्धक जुबेरला मदत केल्यामुळे शबनमला शेराने धमकी दिली असा आरोप शेरावर करण्यात आला आहे. जुबैर खानला सलमान खान कुत्ता म्हणाला होता.तसंच त्याने जुबैरला धमकावलंही होतं. त्यानंतर जुबैर खान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता.बाहेर आल्यावर त्याने सलमानला खुलं आव्हान दिलं आहे. याच जुबैर खानची जवळची मैत्रीण शबनम शेख आहे. शेराने या शबनमला याच प्रकरणाच्या संदर्भात धमकावल्याचं शबनमने सांगितलं आहे.दरम्यान याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

काय आहे जुबैर खान प्रकरण


जुबैर खान दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा जावई असल्याचं सांगून बिग बॉसमध्ये आला होता.पण नंतर त्याचा आणि हसीन पारकरच्या कुटुंबाचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट झालं होतं.तसंच बिग बॉसमधील इतर स्पर्धकांशी तो अत्यंत अर्वाच्च भाषेत बोलला होता. यावरूनच सलमान खान आणि जुबैर खानचं भांडण झालं होतं.

आता शेरावर लागलेल्या या आरोपांचं पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close