• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जगभरात धुमाकूळ घालणारा ‘बाहुबली’ आता मराठीत

जगभरात धुमाकूळ घालणारा ‘बाहुबली’ आता मराठीत

जगभरात धुमाकूळ घालणारा ‘बाहुबली’ आता मराठीत पाहायला मिळणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मराठी ‘बाहुबली’तील बाहुबली या पात्राला आपला आवाज दिला आहे.

 • Share this:
  मुंबई 19 ऑक्टोबर :  भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक एस.एस. राजामौली दिग्दर्शित व सुपरस्टार प्रभासच्या अभिनयानं सजलेल्या ‘बाहुबली’ (baahubali) या सिनेमाने इतिहास रचला. उत्कृष्ट कथानक, तितकाच उत्कृष्ट अभिनय आणि तितकंच उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेला या सिनेमाचे देशभराताच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. आता हा सिनेमा तुम्हाला तुमच्या मराठी मायबोलीत (baahubali in marathi) पाहायला मिळणार आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने स्वप्नवत असा हा सिनेमा मराठीत आणण्याचा विचार केला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी स्वीकारली आहे. तर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मराठी ‘बाहुबली’तील बाहुबली या पात्राला आपला आवाज दिला आहे. वाचा : Shilpa Shetty - Raj Kundra वरील आरोप Sherlyn Chopra ला महागात; कपलने दाखल केला 50 कोटींचा मानहानीचा खटला या मराठी बाहुबली चित्रपटाचे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. त्यासोबतच मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस यासारख्या दिग्गज कलाकारांनी बाहुबालीमधील इतर पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.कौशल इनामदार यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. वाचा : आली लग्नघटिका समीप! Suyash Tilak-Aayushi Bhave ला लागली हळद; पाहा क्युट कपलचे Photo आता हा मराठी ‘बाहुबली’ दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, गुरुवार 4 नोव्हेंबरला दुपारी 12.00 आणि सायंकाळी 7.00 या वेळेत. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर प्रसारित होणार आहे त्यावेळी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: