• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sidharth Shukla Death: शेहनाझच्या हातावर सिद्धार्थनं सोडला जीव? पाहा काय घडलं होतं

Sidharth Shukla Death: शेहनाझच्या हातावर सिद्धार्थनं सोडला जीव? पाहा काय घडलं होतं

सिद्धार्थच्या मृत्युनंतर शेहनाझ मोठा धक्का बसला आहे. कारण त्यावेळी शेहनाझ देखील तिथेच उपस्थित होती.

 • Share this:
  मुंबई 3 सप्टेंबर : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अनेक आठवणी सध्या त्याचे चाहते शेअर करताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. आज मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार होणार आहेत. दरम्यान त्याचे जवळचे कुटुंबिय आणि मित्र मैत्रिणी देखील मोठ्या दुःखात आहेत. बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली जोडी शेहनाझ गिल (Shenaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला चाहत्यांचे फारच आवडते होते. शेहनाझ ही सिद्धार्थची अगदी जवळची मैत्रीण होती. तर त्याची कथित प्रेयसी असल्याचं म्हटलं जातं. सिद्धार्थच्या मृत्युनंतर तिला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यावेळी शेहनाझ देखील तिथेच उपस्थित होती. सिद्धार्थचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं कूपर रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान रात्रीपासून सिद्धार्थला फार अस्वस्थ वाटत होतं. इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री 9:30 वाजता घरी आला होता. त्यावेळी त्याला बरं वाटत नसल्याचं त्याने आपल्या आईला सांगितलं होतं. तेव्हा शेहनाझ देखील तिथेच होती. त्यामुळे त्यांनी आधी सिद्धार्थला लिंबू पाणी पिण्यास दिलं व नंतर आइसक्रिम दिली जेणेकरून त्याला बरं वाटेल. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. व सिद्धार्थला अजूनही बरं वाटत नव्हतं. तेव्हा शेहनाझ आणि त्याच्या आईला त्याला आराम करण्यास सांगितलं. दरम्यान सिद्धार्थ झोपू शकत नव्हता तर लागोपाठ त्याला अस्वस्थ आणि बेचैन जाणवत होतं. तेव्हा त्याने शेहनाझला आपल्या सोबत राहण्यास सांगितलं व पाठ थोपटण्यास सांगितली. 1:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाझच्या मांडीवर झोपी गेला. व नंतर दुसरीकडे सरकत तो झोपला. त्यानंतर 7 वाजता शेहनाझ देखील झोपी गेली. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की, सिद्धार्थच्या त्याच अवस्थेत झोपला आहे जसा रात्री झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणतीच हालचाल करत नव्हता. सिद्धार्थ कोणतीच हालचाल करत नाही हे पाहून शेहनाझ घाबरली. तिने ताबडतोब त्याच्या आईकडे 5 व्या मजल्यावर धाव घेतली. जिथे सिद्धार्थचं कुटुंब राहतं. तर सिद्धार्थ आणि शेहनाझ हे 12 व्या मजल्यावर होते. त्यानंतर सिद्धार्थच्या फॅमिली डॉक्टरला बोलावण्यात आलं मात्र तोपर्यंत सिद्धार्थचा मृत्यु झाला होता. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्युने त्याच्या कुटुंबियांसह शेहनाझलाही मोठा धक्का बसला होता. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती सध्या मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. व सिद्धार्थचा मृत्यु तिने अजूनही स्विकारला नाही.
  Published by:News Digital
  First published: