'मुंबई, 28 जानेवारी- अभिनेत्री शेहनाज गिल
(Shehnaaz Gill) सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या साध्या आणि मजेशीर स्वभावाने शेहनाजने सर्वांचं मन जिंकलं आहे. शेहनाज गिल एक अशी अभिनेत्री आहे जिनं आपल्यामध्ये फार मोठा बदल केला आहे. अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून भलेभले थक्क होतात. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या वेट लॉस
(Weight Loss) जर्नीबद्दल खुलासा केला आहे.
शेहनाज गिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तसेच सोशल मीडियावर तिचे अनेक फॅन पेजसुद्धा आहेत. सतत सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान होस्ट जेनिस सिक्वेरा यांनी शेहनाज गिलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तीवेट लॉसबद्दल बोलताना दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये युट्युबर यशराज मुखुटेसुद्धा आहे. तोसुद्धा शेहनाजच्या बोलण्याने इम्प्रेस झालेला दिसून येत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये शेहनाज सांगत आहे, 'वजन कमी करणं कठीण नाहीय. कारण हे प्रत्येकाच्या इच्छेवर असतं. जर तुम्ही एखादी गोष्ट मनात ठाम केली तर ती नक्कीच पूर्ण होते. त्याचं फळ नक्कीच मिळतं. परंतु जर तुमचीच इच्छाशक्ती कमकुवत असेल तर त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. माझ्याकडे सुरुवातीला चांगल्या ऑफर्स नव्हत्या. त्यामुळे मी माझ्या वजनकडे लक्ष नाही दिलं. तसेच मी त्यावेळी पंजाबमध्ये काम करत होते. आणि तिथे असेच धष्टपुष्ट असतात. त्यामुळे कधी त्याची गरज नाही भासली. परंतु आता मला काही ऑफर्स मिळत आहेत. त्यासाठी मला स्वतः असं वाटलं की वजन कमी करायला हवं. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला'. असं शेहनाज म्हणाली.
अभिनेत्री शेहनाज गिलने बिग बॉस 13 मधून सर्वांनाच आपलंसं केलं आहे. या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली होती. प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि तिची केमिस्ट्री फारच पसंत होती. नुकताच शेहनाजने आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. अभिनेत्री नुकताच हौसला रख या चित्रपटात झळकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.