बिग बॉस 13 : 'पंजाबची कतरिना कैफ' सलमानशी बोलली खोटं, वाचा काय आहे प्रकरण

बिग बॉस 13 : 'पंजाबची कतरिना कैफ' सलमानशी बोलली खोटं, वाचा काय आहे प्रकरण

शहनाझ सिद्धार्थ शुक्लासोबतच्या बॉन्डिंगमुळे जास्त चर्चेत आहे. शहनाझ सिद्धार्थसोबतची जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : बिग बॉस 13 हा सीझन मागच्या सीझनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गाजलं. बिग बॉस 13 च्या फिनालेला जास्त काळ राहिला नाही. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आपल्याला बिग बॉस 13 विजेता समजेल. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला रोज नवनवे धमाके पाहायला मिळत आहे. त्याच सर्वाधिक चर्चेत असते ती पंजाबची कतरिना कैफ शहनाझ गिल. अलिकडेच तिने वीकेंडच्या वार दिवशी सलमान खान समोर खूप ड्रामा केला. तिच्या या वागणुकीमुळे तिच्यावर बरीच टिकाही झाली. या सीझनमधील शहनाझ सलमान खानची आवडती सदस्य आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे वीकेंडच्या वारला सलमान खानने तिच्या वागणुकीबद्दल तिला खूप सुनावले. यादरम्यान शहनाझला सलमान खानने तिचे वय देखील विचारलं, तेव्हा तिने सलमानला तिचे खोटं वय सांगितलं.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर शहनाझ गिलचा चाहता वर्ग वाढला आहे. बिग बॉस च्या घरामध्ये शहनाझ ज्या प्रकारे वावरते. तिचं वर्तण बघून असेच वाटते की, ती नक्कीच समंजस नाही आहे. सलमान खानने शहनाझला वय विचारल्यानंतर तिने तिचे वय 25 सांगितलं. मात्र विकीपीडियानुसार शहनाझ 26 वर्षाची आहे आणि 27 जानेवारीला ती 27 वर्षाची होईल.

लग्न न करताच अभिनेत्री झाली आई, आता व्यक्त केली चूक सुधारण्याची इच्छा

 

View this post on Instagram

 

Kya @shehnaazgill sach saabit kar degi @BeingSalmanKhan ki kahi hui baat ko? Isse #SidNaaz ki dosti par kya farak padega? Dekhiye aaj raat 10:30 baje. Anytime on @Voot @Vivo_India #BiggBoss13 #BiggBoss #BB13 #SalmanKhan

A post shared by Colors TV (@colorstv) on

शहनाझ गिलचा जन्म 27 जानेवारी, 1993 साली झाला. यानुसार ती आता 26 वर्षाची असेल. तिचा जन्म चंदीगढ येथील पंजाब मध्ये झाला आहे. शहनाझ चंदीगढमध्येच राहत आहे. तिला डान्स आणि अभिनयाची आवड आहे. पण सध्या शहनाझ सिद्धार्थ शुक्लासोबतच्या बॉन्डिंगमुळे जास्त चर्चेत आहे. शहनाझ सिद्धार्थसोबतची जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Bigg Boss 13 : शहनाझ गिलनं केली लिप KISS ची मागणी, सिद्धार्थ शुक्लानं...

 

View this post on Instagram

 

Keep supporting me guys. Love ❤️❤️ @colorstv #biggboss13

A post shared by Shehnaaz Shine (@shehnaazgill) on

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ शहनाझला समजावताना दिसला. यावेळी त्यानं सांगितलं की, बाहेर गेल्यावर दोघांचीही वेगवेगळी आयुष्यं आहेत. यामुळे इकडे व्यवस्थित विचार करुन गेम खेळ. सिद्धार्थ इशारे करुन शहनाझला हे समजवण्याचा प्रयत्न करत होता. बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊन दोघांचे रस्ते वेगवेगळे होणार आहे. त्यामुळे या घरात कोणासोबत जास्त प्रमाणात कनेक्शन निर्माण करणे हे चांगले नाही. असंही सिद्धार्थनं शहनाझला सांगितलं

Gangubai Kathiawadi : आलिया भटचा नवा अवतार, माफिया क्वीनचा फर्स्ट लुक रिलीज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 04:09 PM IST

ताज्या बातम्या