मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सिद्धार्थ मेरा बच्चा', शेवटच्या क्षणी पूर्णपणे कोलमडली शेहनाझ; स्मशानभूमीत त्याच्या पायाजवळच बसून राहिली

'सिद्धार्थ मेरा बच्चा', शेवटच्या क्षणी पूर्णपणे कोलमडली शेहनाझ; स्मशानभूमीत त्याच्या पायाजवळच बसून राहिली

सिद्धार्थच्या नावाने ओरडतच स्मशानभूमीत गेलेल्या शेहनाझ गिलची अवस्था खूपच वाईट होती.

सिद्धार्थच्या नावाने ओरडतच स्मशानभूमीत गेलेल्या शेहनाझ गिलची अवस्था खूपच वाईट होती.

सिद्धार्थच्या नावाने ओरडतच स्मशानभूमीत गेलेल्या शेहनाझ गिलची अवस्था खूपच वाईट होती.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Sidharth shukla) शेवटचं पाहण्यासाठी स्मशानभूमीत गेलेल्या शेहनाझ गिलच्या (Shehnaaz gill) एका व्हिडीओने सर्वांनाच हादरवून सोडलं. सिद्धार्थ...  सिद्धार्थ...  ओरडतच ती स्मशाभूमीच्या दिशेने धावत गेली होती. त्यानंतर तिने जेव्हा सिद्धार्थला शेवटचं पाहिलं तेव्हा तिची अवस्था अतिशय भयंकर होती.

शेहनाझने स्मशानभूमीत जेव्हा सिद्धार्थला शेवटचं पाहिलं तेव्हा तिथं नेमकं काय झालं याचा खुलासा संभावना सेठने केला आहे.  ई-टाइम्सशी बोलताना संभावना म्हणाली, सिद्धार्थ मेरा बच्चा म्हणत शेहनाझ रडतच होती. मुखाग्नी देण्याआधी जेव्हा सिद्धार्थचं शेवटचं दर्शन होत होतं, तेव्हा शेहनाझ सिद्धार्थच्या पायाजवळ बसली.

शुक्रवारी सिद्धार्थवर अंत्यसंस्कार झाले. स्मशानभूमीजवळ पोहोचतात सिद्धार्थ सिद्धार्थ (Shehnaaz gill calling Sidharth)  ओरडतच ती स्मशानभूमीच्या दिशेने धावली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  सिद्धार्थचं नाव घेणाऱ्या शेहनाझचा आवाज ऐकूनच अंगावर अक्षरशः काटा येतो. डोळ्यात पाणी येतं.

हे वाचा - सिद्धार्थ- शेहनाझच्या लग्नाची सुरू झाली होती तयारी; डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

सिद्धार्थच्या मृत्युनंतर तिला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यावेळी शेहनाझ देखील तिथंच उपस्थित होती. इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री 9:30 वाजता घरी आला होता. त्यावेळी त्याला बरं वाटत नसल्याचं त्याने आपल्या आईला सांगितलं होतं. तेव्हा शेहनाझ देखील तिथेच होती.

सिद्धार्थ झोपू शकत नव्हता तर लागोपाठ त्याला अस्वस्थ आणि बेचैन जाणवत होतं. तेव्हा त्याने शेहनाझला आपल्या सोबत राहण्यास सांगितलं आणि पाठ थोपटण्यास सांगितली. 1:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाझच्या मांडीवर झोपी गेला. नंतर दुसरीकडे सरकत तो झोपला. त्यानंतर 7 वाजता शेहनाझ देखील झोपी गेली. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की, सिद्धार्थच्या त्याच अवस्थेत झोपला आहे जसा रात्री झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणतीच हालचाल करत नव्हता.

सिद्धार्थ कोणतीच हालचाल करत नाही हे पाहून शेहनाझ घाबरली. तिने ताबडतोब त्याच्या आईकडे 5 व्या मजल्यावर धाव घेतली. जिथे सिद्धार्थचं कुटुंब राहतं. तर सिद्धार्थ आणि शेहनाझ हे 12 व्या मजल्यावर होते. त्यानंतर सिद्धार्थच्या फॅमिली डॉक्टरला बोलावण्यात आलं मात्र तोपर्यंत सिद्धार्थचा मृत्यु झाला होता.

हे वाचा - सिद्धार्थ...सिद्धार्थ ओरडत धावत गेली शहनाज गिल; अंगावर काटा आणणारा VIDEO

सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्युने त्याच्या कुटुंबियांसह शेहनाझलाही मोठा धक्का बसला होता. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती सध्या मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. सिद्धार्थचा मृत्यू तिने अजूनही स्वीकारला नाही.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla