मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shehnaaz Gill on Dating Raghav Juyal : राघव जुयाल शेहनाज गिल रिलेशनशिपमध्ये ? अभिनेत्रीनं केला खुलास

Shehnaaz Gill on Dating Raghav Juyal : राघव जुयाल शेहनाज गिल रिलेशनशिपमध्ये ? अभिनेत्रीनं केला खुलास

मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री शेहनाज गिल आणि डान्सर राघव जुयाल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही एकमेकांना डेट करत असल्यांचं म्हटलं जातं होतं. आज अखेर शेहनाजनं त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 18 ऑगस्ट:  बिग बॉस फेम अभिनेत्री शेहनाज गिल मागच्या काही महिन्यांपासून तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानं कोलमडून गेलेली शेहनाज पुन्हा नव्यानं उभी राहिली. तिचा पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्य सुरूळीत सुरू असताना अचानक शेहनाजचं नाव डान्सर राघव जुयालबरोबर जोडण्यात आलं.  मात्र दोघांनी याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. राघवनं कर या चर्चांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. मात्र बऱ्याच दिवसांच्या चर्चांनंतर शेहनाजनं या चर्चांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या शेहनाजची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. शेहनाज गिल काल रात्री तिचा भाऊ पंजाबी सिंगर Anuda Jandaच्या इव्हेंला हजेरी लावली होती. कार्यक्रमा दरम्यान शेहनाजला तिच्या आणि राघवच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारले गेले. यावेळी शेहनाज दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्का मोर्तब करेल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र झालं उलटं. रिलेशनशिपच्या चर्चांवर शेहनाजनं मीडियाची चांगलीच शाळा घेत त्यांच्यावर भडकली.  शेहनाजनं मीडिया इंटरॅक्शनवेळी मीडिया खोटारडी आहे, असं म्हटलं. हेही वाचा - KBC 14 साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलीय इतकी रक्कम; आकडा वाचूनच फुटेल घाम शेहनाजला एका रिपोर्टनं प्रश्न विचारला, 'गेली काही दिवस तुझ्या आणि राघवच्या रिलेशनशिपवर चर्चा होत आहेत. त्यावर तुला असं म्हणायचं आहे की या बातम्या खोट्या आहेत?', या प्रश्नावर उत्तर देत शेहनाज म्हणाली, 'हो मीडिया खोट बोलते आणि काहीही बोलते. आता तुम्ही यांच्या बाजूला उभे आहात म्हणजे तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात असा अर्थ होतो का? त्यामुळेच मी म्हणतेय की मीडिया खोटं बोलते'.  शेहनाजच्या या उत्तरानंतर हे स्पष्ट झालं आहे की ती आणि राघव रिलेशनशिपमध्ये नाही.  ते डेटिंग करत नाहीत. राघव आणि शेहनाज काही दिवसांआधी ऋषिकेशला ट्रिपसाठी गेले होते. दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं.  दोघांना एकमेकांची कंपनी आवडते हे सर्वांनाच माहिती आहे. दोघांनी याआधी भाईजान सिनेमा एकत्र काम केलं आहे. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर एकदा बोलताना राघव म्हणाला होता की, 'ही फक्त धुळ आहे काही दिवसातच उडून जाईल'. आता तर दोघांनी त्यांच्या नात्याविषयी मौन सोडलं असल्यानं रिलेशनशिपच्या बातम्यांना पूर्ण विराम मिळाला आहे.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या