मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ...सिद्धार्थ... ओरडतच स्मशानभूमीकडे धावत गेली शेहनाझ गिल; अंगावर काटा आणणारा VIDEO

सिद्धार्थ...सिद्धार्थ... ओरडतच स्मशानभूमीकडे धावत गेली शेहनाझ गिल; अंगावर काटा आणणारा VIDEO

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Sidhart shukla) शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचलेल्या शेहनाझ गिलचा (Shehnaaz gill) व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Sidhart shukla) शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचलेल्या शेहनाझ गिलचा (Shehnaaz gill) व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Sidhart shukla) शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचलेल्या शेहनाझ गिलचा (Shehnaaz gill) व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth shukla) मृत्यूनंतर त्याची अगदी जवळची मैत्रीण शेहनाझ गिल (Shehnaaz gill) पूर्णपणे कोलमडली आहे. तिला सावरणंही कठीण झालं आहे. आज सिद्धार्थवर अंत्यसंस्कार झाले, शेहनाझही तिथं आली होती. स्मशानभूमीजवळ पोहोचतात सिद्धार्थ सिद्धार्थ (Shehnaaz gill calling Sidharth)  ओरडतच ती स्मशानभूमीच्या दिशेने धावली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सिद्धार्थचं नाव घेणाऱ्या शेहनाझचा आवाज ऐकूनच अंगावर अक्षरशः काटा येतो. डोळ्यात पाणी येतं.  सिद्धार्थच्या मृत्युनंतर तिला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यावेळी शेहनाझ देखील तिथंच उपस्थित होती. त्याला शेवटचा निरोप द्यायला आलेल्या शेहनाझला सावरणंही कठीण झालं. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. सतत रडत होती. स्मशानभूमीवर पोहोचताच ती स्वतःला रोखू शकली नाही.

इ टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ रात्री 9:30 वाजता घरी आला होता. त्यावेळी त्याला बरं वाटत नसल्याचं त्याने आपल्या आईला सांगितलं होतं. तेव्हा शेहनाझ देखील तिथेच होती.

हे वाचा - सिद्धार्थला शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी पोहोचली शेहनाझ, अभिनेत्रीला सावरणंही कठीण

सिद्धार्थ झोपू शकत नव्हता तर लागोपाठ त्याला अस्वस्थ आणि बेचैन जाणवत होतं. तेव्हा त्याने शेहनाझला आपल्या सोबत राहण्यास सांगितलं आणि पाठ थोपटण्यास सांगितली. 1:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ शेहनाझच्या मांडीवर झोपी गेला. नंतर दुसरीकडे सरकत तो झोपला. त्यानंतर 7 वाजता शेहनाझ देखील झोपी गेली. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की, सिद्धार्थच्या त्याच अवस्थेत झोपला आहे जसा रात्री झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणतीच हालचाल करत नव्हता.

सिद्धार्थ कोणतीच हालचाल करत नाही हे पाहून शेहनाझ घाबरली. तिने ताबडतोब त्याच्या आईकडे 5 व्या मजल्यावर धाव घेतली. जिथे सिद्धार्थचं कुटुंब राहतं. तर सिद्धार्थ आणि शेहनाझ हे 12 व्या मजल्यावर होते. त्यानंतर सिद्धार्थच्या फॅमिली डॉक्टरला बोलावण्यात आलं मात्र तोपर्यंत सिद्धार्थचा मृत्यु झाला होता.

हे वाचा - siddharth च्या मृत्यूची बातमी ऐकून तरुणी गेली कोमात, डॉक्टरांची ट्विटवर माहिती

सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्युने त्याच्या कुटुंबियांसह शेहनाझलाही मोठा धक्का बसला होता. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती सध्या मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. व सिद्धार्थचा मृत्यु तिने अजूनही स्विकारला नाही.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla