मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'वर Friends मधील दृश्यांंचं भन्नाट रिक्रिएशन

VIDEO: 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'वर Friends मधील दृश्यांंचं भन्नाट रिक्रिएशन

शहनाज गिलचा (Shehnaaz Gill) टॉमी हा संवाद सध्या भलताच व्हायरल होत आहे. आता तिचा हा संवाद वापरुन फ्रेंड्स या प्रसिद्ध शो मधील दृश्यांचं सिक्रिशन करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

  मुंबई, 28 डिसेंबर: सध्याच्या युगामध्ये मिम्स मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. अनेक मिम्स (Meme) तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याचबरोबर विविध व्हिडीओ आवाज देऊन तयार केले जातात. अनेक फेमस डायलॉगचे कॉमेडीमध्ये रूपांतर करून ते मिम्समध्ये वापरले जातात. अशाच पद्धतीने बिग बॉस (Bigg Boss) मधील शहनाज गिल(Shehnaaz Gill)चे काही डायलॉग एका व्हिडिओमध्ये वापरून एक मजेदार व्हिडीओ तयार केला गेला आहे. या डायलॉगमुळे हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकन शो फ्रेंड्समध्ये त्याने शहनाज गिलच्या(Shehnaaz Gill) काही डायलॉगला अतिशय शानदार पद्धतीने वापरले असून तुम्हीदेखील हा व्हिडीओ पाहिल्यास खुश व्हाल. काही दिवसांपूर्वी साथ निभाना साथिया (Saath Nibhaana Saathiya) या मालिकेतील कोकिलाबेन यांचा डायलॉग 'रसोड़े में कौन था? हा खूप व्हायरल झाला होता. यशराज मुखाते (Yashraj Mukhate) याने हा डायलॉग रिक्रिएट केला होता. त्यानंतर आता त्याने शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिचे बिग बॉस(Bigg Boss) मधील काही डायलॉग वापरून एक व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये तिचा फेमस डायलॉग 'त्वाडा कुत्ता टॉमी साडा कुत्ता कुत्ता' यांच्याबरोबरच अनेक डायलॉग वापरून हा व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर खूप व्हायरल झाला असून आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अमेरिकन शो फ्रेंड्समधील काही भाग एडिट करून हे डायलॉग त्यामध्ये टाकण्यात आले असून अतिशय सुंदर पद्धतीने त्याला बिट्स देखील देण्यात आल्या आहेत. 'Friends' या शोमधील  भांडणाचा काही भाग एडिट करून त्यामध्ये शहनाज गिलचे काही डायलॉग वापरण्यात आले आहेत. केतन प्रशांत बक्षीने हा व्हिडीओ एडिट केला आहे. त्यामुळं हे पाहण्यास खूप मजा येत आहे.
  दरम्यान, हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत असून विविध युजर्सच्या प्रतिक्रिया देखील यावर येत आहेत. काहीजणांनी हा व्हिडीओ खूपच उत्तम असल्याचं म्हटलं आहे तर काहीजणांनी 'साडा कुत्ता कुत्ता, त्वाडा कुत्ता टॉमी' या डायलॉगचे आतापर्यंतचे सर्वात उत्तम व्हर्जन असल्याचं म्हटलं आहे. शहनाज गिल ही पंजाबमधील मॉडेल आणि गायिका असून बिग बॉस 13 मध्ये तिची सिद्धार्थ शुक्ला बरोबरची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. या शोमध्ये दोघानांही भरभरून प्रेम मिळाले होते. तसेच तिचे काही डायलॉग देखील खूप फेमस झाले होते.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bigg boss, Viral video.

  पुढील बातम्या