Bigg Boss 13 : शहनाझ गिलनं केली लिप KISS ची मागणी, सिद्धार्थ शुक्लानं...

Bigg Boss 13 : शहनाझ गिलनं केली लिप KISS ची मागणी, सिद्धार्थ शुक्लानं...

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये शहनाझनं सिद्धार्थकडे लिप किसची मागणी केली.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये शहानाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची चटपटीत केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीत उतरली आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जास्त काहीतरी असल्याची चर्चा बिग बॉस घरात आणि घराबाहेरही सुरू आहे. शहनाझनंही सिद्धार्थकडे प्रेमाची कबुली दिली आहे. पण अशातही आता शहनाझच्या एका कृतीमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये शहनाझनं सिद्धार्थकडे लिप किसची मागणी केली. त्यांच्या या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

शहनाझ गिल बाथरुम एरियामध्ये मेकअप करत असताना सिद्धार्थ त्या ठिकाणी येतो. त्यावेळी शहनाझ त्याला किस करायला सांगते. यावर सिद्धार्थ तिच्या हातावर किस करतो. शहनाझ त्याला गालावर किस करण्यास सांगते पण तिच्या चेहऱ्यावर मेकअप असल्यानं सिद्धार्थ तिला फ्लाइंग किस देतो. पण ही गोष्ट शहनाझला आवडत नाही आणि ती त्याच्या बोलणं बंद करण्याची धमकी देते त्यामुळे सिद्धार्थ तिला गालावर किस करतो. त्यानंतर शहनाझ त्याला ओठांवर किस करण्यास सांगते मात्र सिद्धार्थ असं करण्यास नकार देतो.

सिद्धार्थ तिला सांगतो की, मला एलर्जी होते त्यामुळे मी करणार नाही आणि माझी आई गावात राहिलेली असल्यानं तिला हे सर्व आवडत नाही. यावर उत्तर देताना शहनाझ सांगते की माझी आई सुद्धा गावातली आहे. पण तुम्ही सर्व लिप किसचा चुकीचा अर्थच का घेता. पण यामध्ये आरती सिंह सुद्धा सिद्धार्थची बाजू घेते आणि सांगते की त्यांच्या घरी असं करण नॉर्मल गोष्ट मानली जात नाही.

View this post on Instagram

#family #task @bigboss_khabari_13

A post shared by Bigboss 13 (@bigboss_khabari_13) on

यानंतर सिद्धार्थ शहनाझला समजावतो की या शोमधून बाहेर पडल्यानंतर आपलं नातं वेगळं असणार आहे. आपण जास्त एकमेकांशी बोलू शकणार नाही आणि आपापल्या लाइफ आणि करिअरमध्ये बीझी होऊ. यानंतर येत्या एपिसोडमध्ये जेव्हा सर्वांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येतात तेव्हा शहनाझचे बाबाही तिला सिद्धार्थ पासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसतात.

Published by: Megha Jethe
First published: January 15, 2020, 11:23 AM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading