Home /News /entertainment /

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलच्या वडिलांनी मुलीसाठी घेतला मोठा निर्णय

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलच्या वडिलांनी मुलीसाठी घेतला मोठा निर्णय

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या(Sidharth Shukla) मृत्यूला १४ दिवस झाले आहेत. मात्र अजूनही शेहनाज गिल(Shehnaz Gill) या दुःखातून सावरलेली नाहीय.

    मुंबई, 15 सप्टेंबर- अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या(Sidharth Shukla) मृत्यूला १४ दिवस झाले आहेत. मात्र अजूनही शेहनाज गिल(Shehnaz Gill) या दुःखातून सावरलेली नाहीय. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी शेहनाजची जी छायाचित्रे समोर आली होती. ते पाहून चाहत्यांच्या मनात चर्र झालं होतं. शेहनाजची अवस्था पाहून सर्वांनाच तिची चिंता वाटत आहे. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाज एकटी पडली आहे. तिच्या वडिलांना तिची हि अवस्था पाहावत नाहीय. त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ शुक्लावर वेड्यासारखं प्रेम करणारी शेहनाज त्याच्या जाण्याने स्वतःला एकटं समजत आहे. सिद्धार्थच्या दुःखातून तिला सावरणं मोठं कठीण झालं आहे. शेहनाजचे वडील संतोख सिंह गिल यांनासुद्धा आपल्या मुलीची हि अवस्था पाहवत नाहीय. त्यामुळे शेहनाजच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी ते सर्व प्रयत्न करत आहेत. नुकताच संतोख यांनी शेहनाजला दिलासा देण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आपल्या हातावर शेहनाजच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. त्यांनी काढलेल्या या टॅटूचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हे वाचा:Met Gala 2021 दरम्यान सोशल मीडियावर ट्रेन्ड होतोय रणवीर सिंग) व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आपल्याला दिसून येत आहे, शेहनाजच्या वडिलांच्या हातावर जो टॅटू आहे, त्यामध्ये प्रार्थनेला जोडलेले दोन हात आहेत. शिवाय हातात गुलाबाचं फुल आहे. आणि त्यामध्ये शेहनाजचं नाव काढलेलं आहे. (हे वाचा:बापरे! यामी गौतमच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था! पाहून तुम्हालाही भरेल धडकी) मीडिया रिपोर्टनुसार, शेहनाज कोणाशीही बोलत नाही. शांत शांत बसलेली असते. या वेळेत सिद्धार्थची आई तिची संपूर्ण काळजी घेत आहे. तिला अजिबात एकटं राहू देत नाही.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Sidharth shukla

    पुढील बातम्या