मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाने एयरपोर्टवर पतीला केलं KISS; व्हिडीओ VIRAL होताच झाली ट्रोल

'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाने एयरपोर्टवर पतीला केलं KISS; व्हिडीओ VIRAL होताच झाली ट्रोल

 'काटा लगा गर्ल' म्हणून अभिनेत्री शेफाली जरीवालाला   (Shefali Jariwala)  ओळखलं जातं. शेफाली नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते.शेफाली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

'काटा लगा गर्ल' म्हणून अभिनेत्री शेफाली जरीवालाला (Shefali Jariwala) ओळखलं जातं. शेफाली नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते.शेफाली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

'काटा लगा गर्ल' म्हणून अभिनेत्री शेफाली जरीवालाला (Shefali Jariwala) ओळखलं जातं. शेफाली नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते.शेफाली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 डिसेंबर-   'काटा लगा गर्ल' म्हणून अभिनेत्री शेफाली जरीवालाला   (Shefali Jariwala)  ओळखलं जातं. शेफाली नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते.शेफाली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शेफाली आणि पती अभिनेता पराग त्यागीचा   (Parag Tyagi)  एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे एयरपोर्टवर एकमेकांना किस   (Kissing Video Viral)  करताना दिसत आहेत.

मनोरंजन सृष्टीतील कलाकार अनेकवेळा मीडियासमोर आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करताना किंवा रोमँटिक पोज देताना दिसून येतात. असंच काहीसं या व्हिडीओमध्येसुद्धा दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि अभिनेता पराग त्यागी एकमेकांना एयरपोर्टवर किस करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दोघांचे चाहते या जोडीला रोमँटिक म्हणत त्यांचं कौतुक करत आहेत. तर नेटकरी त्यांना प्रचंड ट्रोल करत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल होताच.युजर्सनी यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी या व्हिडीओला ट्रोल करत म्हटलं आहे, या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करण्याचा नाहीत. त्यामुळे हे ठीक नाही. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'शो ऑफ करायची काय गरज आहे.हे सगळं घरी बसून करा'. दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, 'या सगळ्या रूमच्या आत करायच्या गोष्टी आहेत',. तर आणखी एकाने लिहिलं आहे, 'फक्त किस नको तर अभिनयपण शिकून घ्या'. तर दुसऱ्या एकाने लिहिलं कोरोना पसरवण्याचा हा चांगला मार्ग आहे'. अशा अनेक कमेंट्स करून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. परंतु त्यांचे चाहते त्यांना रोमँटिक कपल म्हणून त्यांचं कौतुक करत आहेत.

(हे वाचा:जेठालालची क्रश बबिता अखेर प्रेमात; मुनमुन दत्ताने जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली )

शेफाली जरीवाली 'कांटा लगा' या व्हिडीओ ऍल्बममुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्येसुद्धा काम केलं आहे. तसेच तिनं अभिनेता पराग त्यागीसोबत काम केलं आहे. पराग त्यागीनेसुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्याला पवित्र रिश्ता मालिकेमुळे खास ओळखलं जात. या मालिकेत त्याने विनोद अर्थातच अर्चनाच्या भावाची भूमिका साकारली होती. या दोघांचं हे दुसरं लग्न आहे. शेफाली आणि पराग या दोघांच पहिलं लग्न अयशस्वी ठरलं होतं. परंतु आता हे दोघे एकेमकांसोबत फारच आनंदाने आयुष्य जगत आहेत. शेफाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते घायाळ होतात.

शेफाली जरीवाला बिग बॉस १३ मध्येसुद्धा सहभागी झाली होती. या शोमुळेसुद्धा ती प्रचंड चर्चेत आली होती. या शोमध्ये त्याने स्पर्धक असलेल्या हिंदुस्थान भाऊला आपला भाऊ मानला होता. शेफाली आजही त्याला रक्षाबंधनला राखी बांधते.

First published:

Tags: Entertainment, Tv actress