मुंबई, 25 जून : गेली अनेक वर्ष राजकारणात व्यस्त असलेले शत्रुघ्न सिन्हा लवकरच सिनेमात परत येतायत. आणि तेही मराठी सिनेमात. नेटवर्क18शी बोलताना ते म्हणाले, हल्ली मराठी फिल्म इंडस्ट्री खूपच पुढे आलीय. अनेक बाॅलिवूड कलाकार मराठी सिनेमा बनवतायत. माधुरी दीक्षितनं मराठी सिनेमा केला, तर प्रियांका चोप्राही मराठी सिनेमांची निर्मिती करतेय. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले मला मराठी सिनेमात चांगली भूमिका मिळाली तर मी तिथूनच पदार्पण करेन.
बाॅलिवूडमध्ये शत्रुघ्न सिन्हानं अनेक खलनायिकी भूमिका केल्यात. आताही ते अनेक सिनेमांची स्क्रीप्टस् वाचतायत. पण आता वेळ नसल्यानं कुठलीही आॅफर स्वीकारत नाहीत.
या मुलाखतीच्या वेळी शत्रुघ्न सिन्हांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीबद्दलही सांगितलं. ते म्हणाले, बिग बी आणि मी चांगले मित्र आहोत. आमची मैत्री खूप चांगली आहे. मध्यंतरी आम्हा दोघात गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न झाले. पण ते यशस्वी झाले नाहीत.
आता शत्रुघ्न सिन्हांचा 'खामोश' आपल्याला मराठीत कधी ऐकायला मिळतो, याची वाट पाहायची.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा