'गृहिणींच्या कामाची किंमत पैशात होऊच शकत नाही पण...' शशी थरुर यांचं कंगना रणौतला उत्तर

'गृहिणींच्या कामाची किंमत पैशात होऊच शकत नाही पण...' शशी थरुर यांचं कंगना रणौतला उत्तर

कंगना रणौतच्या (Kangna Ranaut) ट्वीटला शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी उत्तर देत तिला कोपरखळी मारली आहे. आता पंगा क्वीन शांत बसणार की नवा पंगा सुरू करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी: अभिनेत्री कंगना रणौतने (Kangna Ranaut) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) कधी कोणता वाद सुरू करेल हे सांगता येत नाही. बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींशी पंगा घेतल्यानंतर तिने आता शशी थरुर (Shashi Tharoor) यांना लक्ष्य केलं आहे. कमल हसन यांच्या एका ट्वीटवर शशी थरुर यांनी म्हटलं होतं की, 'प्रत्येक राज्यातील सरकारने घर सांभाळणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा भत्ता द्यायलाच हवी. यामुळे महिला शक्तिशाली आणि स्वायत्त होतील.' शशी थरुर यांच्या ट्वीटवर कंगनाने ट्वीट करत टीका केली.

काय म्हणाली होती कंगना?

कंगना रणौत म्हणाली, 'प्रेमाला पैशात मोजू नका. आमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आम्हाला पगाराची गरज नाही. आमच्या छोट्याच्या राज्याच्या आम्ही राणी असतो. त्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही. प्रत्येक गोष्टीला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघू नका. महिलांना फक्त प्रेम आणि आदराची गरज आहे. त्यांचं प्रेम पैशात मोजू नका.' अशा आशयाचं ट्वीट कंगनाने केलं होतं.'

शशी थरूर यांनी काय उत्तर दिलं?

कंगनाच्या ट्वीटवर शशी थरुर यांनी उत्तर दिलं आहे की, 'कंगना मी तुझ्या मताशी सहमत आहे. गृहिणींच्या कामाची किंमत पैशांमध्ये होऊच शकत नाही पण विषय हा आहे की, घर सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या कामाची कधीच किंमत केली जात नाही आणि प्रत्येक महिलेकडे स्वत:चं असं उत्पन्नाचं साधन असायलाच हवं. भारतातल्या सगळ्या महिल्या तुझ्यासारख्या स्वयंपूर्ण झालेल्या तर ते मला नक्कीच आवडेल.' शशी थरुर यांच्या शेवटच्या वाक्यातून त्यांनी कंगनाला कोपरखळी मारली आहे. आता कंगना यावर काय उत्तर देणार? पुन्हा नवा वाद सुरू होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच थलायवी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तिच्या हातात आता तेजस आणि धाकड असे 2 चित्रपट आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: January 5, 2021, 6:55 PM IST

ताज्या बातम्या