हे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे

हे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे

त्यांच्या सिनेमांचं गारूड अजूनही रसिकांच्या मनात आहे. राज कपूर यांच्या आग आणि आवारा सिनेमांत त्यांनी राज कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती.

  • Share this:

04 डिसेंबर : शशी कपूर काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांच्या सिनेमांचं गारूड अजूनही रसिकांच्या मनात आहे. राज कपूर यांच्या आग आणि आवारा सिनेमांत त्यांनी राज कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती.

यश चोप्रांसोबत त्यांचा फिल्मी सफर सुरू झाला होता. त्यांनी 160हून जास्त सिनेमे केले. त्यांच्या 10 सर्वोत्तम सिनेमांवर एक नजर

1. धर्मपुत्र

यश चोप्रांच्या धर्मपुत्रद्वारे त्यांनी बाॅलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमात त्यांच्यासोबत अशोक कुमार आणि माला सिन्हाही होते.

2. वक्त

1964मध्ये त्यांनी या सिनेमात विजय कुमारची भूमिका केली होती.

3. निंद हमारी ख्वाब तुम्हारे

1965मध्ये आलेल्या या सिनेमातते अनवरच्या भूमिकेत होते. आणि नायिका होती नंदा.

4. सुहाना सफर

ही एक प्रेमकथा होती. त्यात शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांची केमिस्ट्री चांगली जुळली होती.

5. शर्मिली

हा एक हिट सिनेमा. राखीचा डबल रोल. शशी कपूरचा कॅप्टन अजित सगळ्यांना आवडला होता.

6. दिवार

मेरे पास माँ है हा अजरामर डायलाॅग या सिनेमानं त्यांना दिला. 1975मध्ये आलेला दिवार. अमिताभ बच्चनसोबतचा त्यांचा इन्स्पेक्टर छाप पाडून गेला.

7. कभी कभी

यश चोप्रांचा हा अजरामर सिनेमा. नात्यांची गुंतागुंत. शशी कपूर आणि राखी यांची जोडी खुलून दिसत होती.

8. काला पत्थर

1979मध्ये आलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन, राखी, परवीन बाबी, नितू सिंग, शत्रुघ्न सिन्हा असे मोठे कलावंत असूनही शशी कपूर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

9. सत्यम शिवम सुंदरम

1977मध्ये आलेला हा सिनेमा गाजला. झिनत अमान आणि शशी कपूर यांची जोडी खुलून दिसली. यात त्यांनी राजीव या इंजिनीयरची भूमिका साकारली होती.

10. न्यू देल्ही टाईम्स

1986मध्ये आलेल्या या सिनेमात त्यांनी पत्रकाराची भूमिका वठवली होती. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 08:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading